

नांदेड, (प्रतिनिधी)- वसमत गावातील भूमिपुत्र पोलीस निरिक्षक गजानन सैदाने यांचे उपचारादरम्यान हैदराबाद येथे निधन झाले.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार गजानन सैदाने यांच्यावर काही दिवसापूर्वी पासून हैदराबादच्या दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यांना अखेर काल रात्री मृत्यू प्राप्त झाला. गजानन सैदाने (53) यांच्यावर आज दुपारी त्यांच्या मूळ गावी वसमत येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्यांच्यापेक्षा आई, पत्नी, एक मुलगा,एक मुलगी आणि भावंडे असा परिवार आहे. वास्तव न्यूज लाईव्ह सैदाने कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.