नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी अकरा वाजता “बाळशास्त्री जांभेकर “यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यलेखाधिकारी डॉ.जनार्दन पक्वान्ने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मुख्य प्रशासकीय इमारत तिसरा माळा प्रशिक्षण हॉल येथे यावेळी मुख्य लेखापरीक्षक टी एल भिसे, गुलाम मो सादेख, सुधीर इंगोले, अशोक सुर्यवंशी, महेश आसणे, राजकुमार लोहिया यांच्या सह कर्मचारी यांची उपस्थिती होती.
