नांदेड(प्रतिनिधी)-बऱ्याच दिवसांपासून रिक्त असलेल्या नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या खुर्चीवर आज विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.जय जाधव विराजमान झाले आहेत.
डिसेंबर 2022 च्या दुसऱ्या आठवड्यात नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांची मुंबईच्या वाहतुक विभागात बदली झाली. तेंव्हापासून या पदाचा कार्यभार औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रसन्ना यांच्याकडे होता. पुढील काही दिवसांमध्ये राज्याचे राज्यपाल विद्यापीठ नांदेड येथे काही कार्यक्रमासाठी येणार आहेत.या पार्श्र्वभूमीवर कार्यक्रमाचे योग्य नियोजन व्हावे म्हणून शासनाने तात्पुर्त्या स्वरुपात डॉ.जय जाधव यांना नांदेड पोलीस परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरिक्षक या पदावर पाठविले आहे. वैद्यकीय पदवी प्राप्त करून डॉ.जय जाधव पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांचे मुळ गाव सोलापूर जिल्ह्यात आले असे सांगण्यात आले.
