ताज्या बातम्या नांदेड

गांधी पुतळ्याजवळ सापडलेल्या मयत अनोळखी माणसाबाबत पोलीसांनी जारी केली शोध पत्रिका

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधी पुतळाजवळ एक 60 वर्षीय अनोळखी माणुस मयत अवस्थेत सापडला आहे. वजिराबाद पोलीसांनी त्याच्या नातलगांना शोधण्यासाठी शोध पत्रिका जारी केली आहे.
दि.16 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 5 वाजता गोपाळ मोहनलाल यादव यांनी दिलेल्या खबरीनुसार गांधी पुतळाजवळ भिंतीलगत एक माणुस मरण पावलेल्या अवस्थेत होता. याबाबत वजिराबाद पोलीसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 174 प्रमाणे आकस्मात मृत्यू क्रमांक 11/2023 दाखल केला. या घटनेचा तपास करण्याची जबाबदारी पोलीस अंमलदार डी.एस.केंद्रे बकल नंबर 1824 यांच्याकडे देण्यात आली.
डी.एस.केंद्रे यांनी जारी केलेल्या शोध पत्रिकेनुसार मयत व्यक्ती हा 60 वर्षाचा असावा त्याचा रंग सावळा आहे, चेहरा लांबट आहे, उंची 5 फुट आहे, बांधा सडपातळ आहे, मयत अनोळखी व्यक्तीने अंगात फुल बाह्यांचा हिरवट रंगाचा शर्टृ व मळकट विटकरी रंगाची लुंगी परिधान केलेेली आहे, मयत अनोळखी व्यक्तीचे नाक सरळ आहे, त्यांचे केस साधारण काळे पांढरे आहे.
डी.एस.केंद्रे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या अनोळखी मयत व्यक्तीस कोणी ओळखत असेल तर त्याबाबतची माहिती त्यांनी पोलीस ठाणे वजिराबाद येथे द्यावी. वजिराबाद पोलीस ठाण्याचा दुरध्वनी क्रमांक 02462-236500 यावर आणि डी.एस.केंद्रे यांचा मोबाईल क्रमांक 9970381047 यावर सुध्दा माहिती देता येईल.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *