नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या एलसीबीसाठी गुडघ्याला बाशिंगे बांधून काही पण करण्याची तयारी ठेवणाऱ्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्यावर नांदेड शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अर्धापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. यांच्यासह वजिराबाद येथे विकास पाटील, शिवाजीनगर येथे मोहन भोसले अशा एकूण 9 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या आणि 20 सहाय्यक पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी जारी केले आहेत.
पोलीस अधिक्षकांनी बदल्या केलेल्या पोलीस निरिक्षकांची नावे पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात दिलेली आहे. मोहन भोसले-उमरी (शिवाजीनगर), श्रीनारायण दुर्गादास सावणे- विमानतळ सुरक्षा(प्रभारी 112), नानासाहेब ज्ञानदेव उबाळे-सायबर सेल(भोकर पोलीस ठाणे), विकास शेकुजी पाटील-भोकर पोलीस ठाणे (वजिराबाद), अभिषेक लक्ष्मणराव शिंदे-नायगाव(धर्माबाद), अशोक ययातीराव घोरबांड-नांदेड ग्रामीण(अर्धापूर), नामदेव लिंबाजीराव रिठ्ठे-माहुर(पोलीस कल्याण विभाग), महेश मुरारीलाल शर्मा-मुदखेड(जिल्हा विशेष शाखा, विशेष सुरक्षा विभाग), विकास विश्र्वंभरराव गोबाडे-मुखेड(दहशतवाद विरोधी कक्ष) असे आहेत.
वजिराबाद येथील जगदीश भंडरवार यांची नियुक्ती अद्याप प्रसिध्द झालेली नाही. तसेच स्थानिक गुन्हा शाखा येथील पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांची बदली प्रसिध्द झालेली नाही. तसेच नांदेड ग्रामीण, मुदखेड, नायगाव, उमरी आणि माहुर येथे दुसरे कोणी पोलीस निरिक्षक पाठविल्याची माहिती प्राप्त झाली नाही. तसेच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कोणाची नियुक्ती झाली याचा पत्ता अद्या वृत्त लिहिपर्यंत लागलेला नाही.शिवाजीनगरचे डॉ.नितीन काशीकर यांना कोठे पाठविण्यात आले आहे याचाही पत्ता अद्याप लागला नाही.
अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब यांना पोलीस अधिक्षकांनी भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी नांदेड ग्रामीण उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक गौहर हसन यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली आहे. एक आयपीएस अधिकारी आणि एक मपोसे अधिकारी मिळून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती कायम राखतील असा विश्र्वास पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना आहे.
सोबतच 20 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यात त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसा लिहिली आहे. माणिक आबासो डाके-माळाकोळी(पोलीस ठाणे शिवाजीनगर), विनोद लक्ष्मण चव्हाण-मनाठा(भाग्यनगर), मल्हारी दुर्गादास शिवरकर-मांडवी(नियंत्रण कक्ष), रवी वैजनाथ वाहुळे-शिवाजीनगर(ईस्लापूर), विजयकुमार दत्ता कांबळे-भाग्यनगर (नांदेड ग्रामीण), नरसिंह राम आनलदास-विमानतळ (इतवारा), राजू सायना मृत्योपोड-इतवारा(वजिराबाद), रविंद्र राजेंद्र कऱ्हे-लोहा(विमानतळ), संगमनाथ माधव परगेवार-देगलूर(भाग्यनगर), रामदास माणिक केंद्रे-बिलोली (वजिराबाद), बालाजी गोविंदराव महाजन-हिमायतनगर(धर्माबाद), राजू दत्तराव वटाणे-मुदखेड(इतवारा), शिवप्रसाद माधवराव कत्ते-धर्माबाद (शिवाजीनगर), संतोष शेषराव शेकडे-एटीसी (मनाठा), श्रीमती दुर्गा बालाजीराव बारसे-विमानतळ सुरक्षा (पोलीस ठाणे विमानतळ), आनंद प्रकाश माळाळे-देगलूर(बिलोली), करीम खान सालार खान पठाण-नियंत्रण कक्ष (विमानतळ), कमल विश्र्वनाथ शिंदे -पोलीस कल्याण विभाग (मुदखेड), संजय धोंडीराम निलपत्रेवार-वजिराबाद(माळाकोळी) असे आहेत.
