संपूर्ण देशभरातून सहभागी होणार विविध संस्था ..
टेक्नोफेस्ट एक्सपो साठी डिजिटल इंडीया चे विशेष सहकार्य मिळणार
नांदेड (प्रतिनिधी)-येथील पोर्टल ईन्फोसिस् या तंत्रज्ञानाशी निगडीत आघाडीच्या संस्थेच्या वतीने येत्या एप्रिल महीन्याच्या पहील्या आठवड्यात टेक्नोफेस्ट एक्सपो चे आयोजन करण्यात आले असून यात
शिक्षण, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील एक्सपो आणि प्रदर्शनांचे आयोजन. तज्ज्ञांद्वारे प्रकल्प आधारित रोमांचक शिक्षण सत्रे, ज्ञान आणि अनुभव सादर करण्यासाठी क्रॉस बॉर्डर नेटवर्किंग प्लॅटफॉर्म, असा कर्तृत्वाची ओळख करून देणार व्यापक व्यासपीठ या ठिकाणी लाभणार असल्याचे प्रतिपादन आयोजक श्री बालाजी गायकवाड यांनी केले आहे.
टेक्नोफेस्ट एक्स्पो हा उद्योग, शैक्षणिक, सरकारी आणि राज्य संस्थांमधून येणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करणारा ठरेल तसेच राज्यातील सर्वात मोठ्या टेक्नोफेस्ट प्रदर्शनात दहा हजांरापेक्षा जास्त अभ्यागतांसमोर शैक्षणिक आणि तंत्रज्ञान नवकल्पना, उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्याची ही संधी असणार आहे.
स्पर्धेसाठी पारीतोषिकाचे स्वरुप हे प्रत्येक गटातून प्रथम,व्दितीय,तृतीय अशा प्रकारे असेल.त्याबरोबरच सहभागी संस्थामधून सर्वात उत्कृष्ट सादरीकरणास इंटेलिजन्स् अवार्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे..
सहभाग व अधिक माहीती साठी संपर्क विविध शाळा, संस्था, महाविद्यालय आदींनी व व्यावसायिक प्रतिष्ठांन आदींनी https://technofest.i लिंकवर क्लिक करा किंवा ८६६८६७१७१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे