परभणी(प्रतिनिधी)-परभणीच्या पोलीस अधिक्षक रागसुधाआर यांनी 13 फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील एकूण 34 पोलीस अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यात पोलीस निरिक्षक, सहाय्यक पेालीस निरिक्षक, पेालीस उपनिरिक्षक आदींचा समावेश आहे.
नवीन नेमणूक झालेले पोलीस निरिक्षक आणि त्यांची नवीन नियुक्ती पुढील प्रमाणे आहे. सुभाष अनमुलवार-नियंत्रण कक्ष परभणी (नवा मोंढा परभणी), सुनिल नागरगोजे-पोलीस नियंत्रण कक्ष (परभणी ग्रामीण), सुनिल रेजीटवाड-जिल्हा विशेष शाखा (सोनपेट पोलीस ठाणे), बुध्दीराज सुकाळे-नियंत्रण कक्ष (पोलीस ठाणे पाथरी), कुंदनकुमार वाघमारे-कल्याण शाखा (पोलीस ठाणे जिंतूर), संतोष सानप-नियंत्रण कक्ष (पैरवी अधिकारी), संजय करनुर-नियंत्रण कक्ष (सायबर पोलीस ठाणे), दिपक दंतुलवार-नियंत्रण कक्ष(विशेष शाखा), गणपत राहिरे-नियंत्रण कक्ष(कल्याण शाखा)असे आहेत.
नवीन पदसंस्थापना मिळालेले सहाय्यक पेालीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. कपील शेळके-वाचक-2(पोलीस ठाणे ताडकळस), नरसींग पोमनाळकर-नियंत्रण कक्ष (पोलीस ठाणे चुडावा), कृष्णा धायवट-पोलीस ठाणे नानलपेठ (पोलीस ठाणे बामणी), सरला गाडेकर-भरोसा सेल(पोलीस ठाणे बोरी), भारत जाधव -पोलीस ठाणे मानवत (सीसीटीएनएस परभणी), बालाजी पुंड-नियंत्रण कक्ष (नानलपेठ पोलीस ठाणे), वसंत मुळे-पोलीस ठाणे बोरी(नानलपेठ पोलीस ठाणे), मुक्तार जफर सय्यद-पोलीस ठाणे ताडकळस(जिंतुर), दिनेश सुर्यवंशी-दैठणा(पालम), वामन बेले-नियंत्रण कक्ष (नवा मोंढा), श्रीनिवास भिकाने-सीसीटीएनएस(पाथरी), अनिल कुरूंदकर- नियंत्रण कक्ष परभणी (परभणी ग्रामीण), शिवाजी देवकते-नियंत्रण कक्ष (पोलीस ठाणे गंगाखेड), शिवप्रकाश मुळे-नियंत्रण कक्ष (भरोसा सेल), गुलाब बाचेवाड-सायबर पोलीस ठाणे (कोतवाली पोलीस ठाणे), संदीप बोरकर-सोनपेठ(एटीसी/ बीडीडीएस), विजय रामोड-ताडकळस(पोलीस नियंत्रण कक्ष) असे आहेत.
नवीन नेमणुक मिळालेले पोलीस उपनिरिक्षक पुढील प्रमणे आहेत. राम जगाडे-सेलू(नवा मोंढा), माधव इजळकर-गंगाखेड(नानलपेठ), श्रीधर तरडे-नियंत्रण कक्ष (ताडकळस), सय्यद चांद-वाचक परभणी ग्रामीण विभाग(वाचक गंगाखेड विभाग), मारोती फड-डायल-112(पोलीस ठाणे चुडावा), माधव लोकुरवार-नियंत्रण कक्ष परभणी(वाचक परभणी ग्रामीण), प्रकाश पंडीत-चुडावा(दामिणी पथक) असे आहेत.
परभणीच्या पोलीस अधिक्षक रागसुधाआर यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक असलेल्या महिला अधिकारी सरला गाडेकर यांना भरोसा सेलमधून काढून पोलीस ठाणे बोरी येथे प्रभारी अधिकारी या पदावर पाठवले आहे. परभणी जिल्ह्यात बोरी पोलीस ठाणे अत्यंत संवेदनशिल मानले जाते. त्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदासाठी राघसुध्दा आर. यांनी भरोसा सेलमधील महिला अधिकाऱ्यावर दाखवलेला भरोसा नक्कीच वाखाणण्यासारखा आहे.
