नांदेड(प्रतिनिधी)-रॉयल सिटी वेदांतनगर, मालेगाव रोड तरोडा येथे काल दिवसा 10 वाजेच्यासुमारास दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजुम यांनी 13 फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
सुमन विकास शर्मा यांनी 112 क्रमांकावर मागितलेल्या मदतीनंतर त्यांच्या घरात होणारा दरोडा पोलीस आणि जनतेने मिळून रोखला त्यातील पाच जणांना पोलीसांनी अर्ध्या तासात जेरबंद केले. पकडण्यात आलेल्या पाच जणांची नावे प्रदीप शंकरलाल स्वामी (19), पवनकुमार रामूराम जाट(24), राजेंद्रकुमार सुरेशकुमार जाट(24), पंकज शंकरलाल स्वामी(21), मनिष नेमीचंद सेन (21) अशी आहेत. हे सर्व राजस्थानचे रहिवासी आहेत. एवढेच नव्हे तर या प्रकरणातील फिर्यादी सुध्दा रा.बगडी तहसील चौमु जि.जयपुर राजस्थानचे आहेत. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 62/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 395 प्रमाणे दाखल झाला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अशोक अनंत्रे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक विजयकुमार कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. आज 11 फेबु्रवारी रोजी पकडलेल्या पाच जणांना विजयकुमार कांबळे, पोलीस अंमलदार धनंजय कुंभरवाड, प्रदीप गर्दनमारे, शेख युनूस, हुंडे, काझी आदींनी न्यायालयात हजर केले. घडलेला प्रकार आणि पोलीसांचा युक्तीवाद मान्य करून न्यायाधीश रुहिना अंजुम यांनी पाच जणांना 13 फेबु्रवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधीत बातमी…
दरोडा अर्ध्या तासातच पोलीसांनी हाणून पाडला ; 112 वर पोलीसांनी दिलेल्या जलद प्रतिसादाचा परिणाम