नांदेड(प्रतिनिधी)-ग्राम सभा थांबवून ग्रामसेवकाच्या कामात शासकीय अडथळा करत त्याच्या शर्टाचे कॉलर धरून ग्रामसभेचे हजेरीपट हिसकावून घेऊन फेकून देणाऱ्या दोघांविरुध्द माहूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रल्हाद ग्यानोबा देवकांबळे हे वानोळा ता.माहूर येथील ग्रामसेवक आहेत. दि.7 फेबु्रवारी रोजी दुपारी ग्रामपंचायत कार्यालय वानोळा समोर ग्रामसभा सुरू होती. या सभेत वानोळा गावातील विलास रामा राठोड आणि गंगा संजय पांडे या दोघांनी आम्हाला जमा खर्च अहवाल काय वाचून दाखवतोस, पावत्या दाखव या बाबत उत्तरे देवून काही फोटो दाखवत असतांना या दोघांनी ग्रामसवेकाचे कॉलर धरून त्याला धमकी दिली, ग्रामसभा बंद पाडली, ग्रामसभेचे हजेरी रजिस्टर हिसकावून फेकून दिले. ग्रामसेवक प्रल्हाद देवकांबळे यांची मानसीक स्थिती बिघडली म्हणून त्यांनी याबाबतची तक्रार उशीरा दिली. माहूर पोलीसांनी या तक्ररीनुसार गुन्हा क्रमांक 6/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक अण्णासाहेब पवार अधिक तपास करीत आहेत.
