हिंगोली(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी 8 फेबु्रवारी रोजी हिंगोली जिल्ह्यातील 7 पोलीस निरिक्षक, 11 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 12 पोलीस उपनिरिक्षक अशा एकूण 30 पोलीस अधिकाऱ्यांच्या नवीन नियुकत्या जारी केल्या आहेत. यामध्ये श्रीमान पंडीतरावजी सोपानरावजी कच्छवे यांनी हिंगोली जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या बोर्डावर आपले नाव लिहुन घेतले आहे.
हिंगोलीचे पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी 8 फेबु्रवारी रोजी काढलेल्या आदेशानुसार 7 पोलीस निरिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात हिंगोली शहर येथील श्रीमान पंडीतरावजी सोपानरावजी कच्छवे साहेबांची नियुक्ती स्थानिक गुन्हा शाखा हिंगोली येथे करण्यात आली आहे. हिंगोलीच्या स्थानिक गुन्हा शाखेतील उदय अशोकराव खंडेराय यांना हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे देण्यात आले आहे.आर्थिक गुन्हा शाखा हिंगोली येथील सोनाजी सुर्यभान आमले यांना हिंगोली शहर पोलीस ठाणे देण्यात आले आहे. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यातील रामकृष्ण नामदेवराव भळघने यांना जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती देण्यात आली आहे.कळमनुरी येथील सुनिल भिमराव निकाळजे यांना पोलीस कल्याण विभाग हिंगोली जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे.शिवाजी दत्तात्रय गुरमे यांना जिल्हा विशेष शाखेतून आर्थिक गुन्हा शाखा येथे पाठविले आहे. वैजनाथ किशनराव मुंडे यांना नियंत्रण कक्षातून पोलीस ठाणे कळमनुरी येथे पाठविण्यात आले आहे.
बदल्या झालेले 11 सहाय्यक पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. माधव मारोती कोरंटलू-पोलीस नियंत्रण कक्ष(नागरी हक्क संरक्षण), दिक्षा चंपतराव लोकडे-पोलीस ठाणे सेनगाव (पोलीस ठाणे औंढा नागनाथ), विलास सुदामराव चवळी- पोलीस ठाणे वसमत ग्रामीण(पोलीस ठाणे बासंबा), विशाखा विठ्ठलराव धुळे-भरसो सेल(पोलीस अधिक्षक यांचे वाचक), अनिल दत्ता काचमांडे-पोलीस ठाणे हिंगोली शहर (पोलीस ठाणे वसमत ग्रामीण), गजानन अर्जुनराव बोराटे-वसमत शहर (पोलीस ठाणे हट्टा), सुनिल महादेव गिरी-पोलीस ठाणे नरसी नामदेव(हिंगोली शहर), रेखा शामराव सहारे-अर्ज शाखा (पोलीस ठाणे कळमनुरी), शिवसांब सुर्यकांत घेवारे-पोलीस नियंत्रण कक्ष(सायबर पोलीस ठाणे), राजेश हनमनलू मल्लपिलू-स्थानिक गुन्हे शाखा (दहशतवाद विरोधी पथक), रवि माधवराव हुंडेकर-नियंत्रण कक्ष(पोलीस ठाणे गोरेगाव).
नवीन नियुक्ती मिळालेले पोलीस उपनिरिक्षक पुढील प्रमाणे आहेत.सुरेश भगवानराव भोसले-पोलीस ठाणे बासंबा(पोलीस ठाणे वसमत शहर),सुवर्णा विश्र्वंभर वाळके-पोलीस ठाणे औंढा (हिंगोली शहर), गजानन शेषराव पाटील -पोलीस ठाणे गोरेगाव(वसमत शहर), मुंजाजी गणपतराव वाघमारे-पोलीस ठाणे औंढा (मुदतवाढ), बाबासाहेब शिवाजीराव खारडे-पोलीस ठाणे वसमत शहर तैनात पोलीस नियंत्रण कक्ष (अनैतिक मानवी वाहतुक कक्ष), सदानंद तुळशीराम मेंडके-वाचक पोलीस उपअधिक्षक हिंगोली(वसमत शहर अतिरिक्त कार्यभार पोलीस उपअधिक्षक वसमत वाचक), किशोर दत्तात्रय पोटे-पोलीस नियंत्रण कक्ष (वाचक पोलीस उपअधिक्षक हिंगोली ग्रामीण), विक्रम पांडूरंग विठ्ठूबोने-हिंगोली शहर(स्थानिक गुन्हे शाखा), भाग्यश्री हनमंतराव कांबळे-सायबर पोलीस ठाणे हिंगोली(हिंगोली ग्रामीण), कृष्णा सखाराम सोनुले-कळमनुरी(मुदतवाढ), राहुल रामानंद महिपाळे-वसमत शहर(मुदतवाढ), युवराज दत्तात्रय गवळी-पोलीस ठाणे कुरूंदा(मुदतवाढ).
नांदेड जिल्ह्यातील एक प्रतिस्पर्धी कमी
नांदेड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर आपली वर्णी लागावी म्हणून अनेक जण रेसमध्ये होते. त्यात श्री.पंडीतरावजी सोपानरावजी कच्छवे साहेब सुध्दा त्यापैकी एक होते. ते फक्त प्रतिस्पर्धी नव्हते तर ते सर्वात पुढे असणारे प्रतिस्पर्धी होते. त्यांची नियुक्ती स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथे करून पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी नांदेड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेतील खुर्चीवर जाण्यासाठी धडपड करणाऱ्यांना थोडासा दिलासाच दिला आहे असे म्हटले तर चुक ठरणार नाही.
