नांदेड,(प्रतिनिधी)- भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत दिनांक 30 जानेवारी ते 11फेब्रुवारी 2023 दरम्यान मध्यप्रदेश जबलपूर येथे आयोजीत पाचव्या खेलो इंडीया युथ गेम राष्ट्रीय धनुर्वीद्या स्पर्धेत नांदेडचा तेजबिरसिंघ चरणकमलजितसिंघ जहागीरदार याने कम्पाउंड प्रकारात उत्कृष्ठ कामगीरी करीत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय धनुर्वीद्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगीरी लक्षात घेवून तेजबिरसिंघ जहागीरदारची खेलो इंडीया युथ गेम स्पर्धेसाठी महाराष्टातून निवड झाली . त्यात त्याने सर्वोत्कृष्ट कामगीरी करीत ओव्हरऑल मध्ये तृतीय स्थान पटकावले. तर फलीमेशन मध्ये चतुर्थ स्थान पटकावले व मिश्र प्रकारात तेजबीर सिंग जहागीरदार व आदिती स्वामी यांनी खेळताना महाराष्ट्रासाठी रौप्य पदकाची कमाई केली . त्याबदल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. . तेजबिरच्या या यशामुळे त्याची केंद्र सरकारच्या वतिने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी तो पात्र ठरला आहे . प्रति वर्ष ५ लाख असे आठ वर्षासाठी तो पात्र ठरला आहे . याच कामगीरीच्या जोरावर त्याची एशीया कप निवडचाचणी साठी तो पात्र पक्षाला आहे.याबाबत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याच्या या यशाबद्दल त्याचे धनुर्विद्या संघटनेचे महासचिव प्रमोद चांदुरकर, ऑलिंपिक प्रशिक्षण चंद्रकांत टीलंग, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावर, नांदेड जिल्हा आर्चरी असोशियन च्या प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड, डॉक्टर नर्सिंग पिंपरने, प्राध्यापक निरंजन अकमाल आदींनी अभिनंदन केले आहे. तसेच शिवबा आर्चरी अकैडमी बुलढाना चे कोच चंद्रकांत इलग यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच रोशनसिंघ जागीरदार,मंगेश कामतीकर, अवतारसिंघ
रामगडिया, राजेश व्यवहारे, तेजबिंरसिंघ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांचे पुतणे असून त्यांचा महाराष्ट्र निर्माण सेनेच्यावतीने सत्कार आयोजित करून अभिनंदन करण्यात आले यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार, मनसे शहराध्यक्ष अब्दुल शफिक, विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष दीपक स्वामी, अनिकेत परदेशी, शक्ती परमार, संतोष सुनेवाड, महिला जिल्हाध्यक्ष उषाताई नरवाडे, गोकुल कौडगे, दिलीप राठोड, योगेश मोरे, शुभम पाटील, अविनाश वैष्णव,राणा सिंग चंदन,राम जाधव संघरत्न जाधव, चंद्रकांत नागुल, नागेश बंगरवार, राहुल शिंदे, आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.