नांदेड (प्रतिनिधी) -दि.६ फेब्रुवारी 2023 रोजी नांदेड वाघाळा महानगरपालिका अंतर्गत झोन क्र.4 येथील सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने झोन क्र.4 अंतर्गत होत असलेल्या बेकायदेशीर अनाधिकृत बांधकाम दिवाबत्ती स्वच्छता व तसेच गुरुद्वारा भागातील रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण आदी मागण्या संदर्भात सतत पाठपुरावा तसेच वारंवार निवेदन देण्यात येऊन देखील कुठली दखल घेतली नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांच्यासह मनसे पदाधिकारी यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधातआक्रमक भूमिका घेऊन सहाय्यक आयुक्त यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घालून धारेवर धरण्यात आले.
जिजामाता हॉस्पिटल डॉक्टर भालेराव यांच्या लगतच्या गल्लीतील संतकृपा मार्केट कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या दुकाने व इमारती रोडवर आल्याने या रस्त्यावर वरदळीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याने मनसेच्या वतीने दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी निवेदनाद्वारे या रस्त्यावरील दुकाने व इमारती ची बांधकाम परवानगी पेक्षा अधिकचे केल्याने या बेकायदेशीर कामाची चौकशी करून बेकायदेशीर अनधिकृत केलेले बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे, अशी मागणी मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे केली असताना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कुठलीच दखल घेण्यात आली नसल्याने व तसेच व्यंकटेश नगर भागातील विद्यार्थ्यांना मोकाट फिरणाऱ्या पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा घेतल्याने त्यांची तक्रार नागरिकांकडून देण्यात आली तर काही भागात बांधकाम परवानगी पेक्षा अधिकचे बांधकाम करीत असल्याची तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्याने त्या अधिकृत बांधकामाच्या विरुद्ध पंचनामा करून पंचनाम्यात अनाधिकृत बांधकाम झाल्याचे सिद्ध झाले असून त्यांना त्यांना अधिकचे बांधकाम पाडण्यात यावे व तसेच बांधकाम थांबवण्यात यावे अशी नोटीस पारित करून देखील नियमाची उल्लंघन करून बांधकाम सुरू ठेवले असून नोटीस पारित करून एक महिना उलटून गेला असून देखील महानगरपालिका प्रशासनाने कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिकांना त्यांच्या तक्राची दाद मिळत नसल्याने महानगरपालिकेत प्रशासक राज असल्याचा फायदा घेऊन अधिकारी वर्गावर कुठली वचक राहिली नसून या मनमानी कारभार विरोधात नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेच्या वतीने महानगरपालिका क्र.4 च्या सहाय्यक आयुक्त यांना घेरावा घालून जॉब विचारण्यात आला.
यावेळी मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष संतोष सुनेवाड मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष दीपक स्वामी, अनिकेत परदेशी, दिलीप राठोड, शुभम पाटील, अविनाश वैष्णव, चंदनसिंग राडा, संगरत्न जाधव, राम जाधव, चंदू नागुल सतीश वाघमारे, नागेश बंगालवार, राहुल शिंदे आदी असंख्य मनसे पदाधिकारी उपस्थित होते.