ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

नांदेड ग्रामीणच्या पोलीस निरिक्षकांनी खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिली

नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.4 फेबु्रवारी रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील रहिमनगर या भागात सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकरणासंदर्भाने आक्षेप घेत जिल्हाधिकारी कार्यालयात सय्यद जमील सय्यद जिलानी यांनी आंदोलन केल्यानंतर सुध्दा आज दि.5 फेबु्रवारी रोजी सुध्दा त्या वादग्रस्त ठिकाणी काम सुरू आहे. सय्यद जमील सय्यज जिलानी यांनी सांगितलेल्याप्रमाणे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत आहेत.

सय्यद जमील सय्यद जिलानी यांनी दस्त क्रमांक 409/2021 नुसार गट क्रमांक 3 मध्ये भुखंड क्रमांक 1 खरेदी केला. या भुखंडासह अनेक भुखंडाबाबत उच्च न्यायालयात झालेल्या निर्णयानंतर सय्यद जिलानी यांनी हा भुखंड खरेदी केला होता. पण त्या ठिकाणी कोणी तरी माजी पोलीस अंमलदार बांधकाम करु लागले. म्हणून सय्यद जमील यांनी आक्षेप घेतला.

हा प्रकार पोलीस ठाणे नंादेड ग्रामीण पर्यंत गेला. जानेवारी महिन्यापासून सुरू असलेला हा वाद पोलीस ठाण्यात गेल्यानंतर सय्यद जमीलला सांगण्यात आले बांधकाम करणारा व्यक्ती हा माजी पोलीस आहे तुम्ही त्याला त्रास देवू नका. पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी 21 जानेवारी 2023 रोजी मला शिवीगाळ करून भुखंडावर न जाण्याची समज दिली त्यावेळी खोट्यात गुन्ह्यात गोवण्याची धमकीपण दिली. हा वादग्रस्त भुखंड ज्या भागात आहे त्यात श्रीमंत मंडळी राहत नाहीत. सय्यद जमील यांच्या दस्त नोंदणीनुसार हा भुखंड सव्वा चार लाख रुपयांमध्ये त्यांनी खरेदी केलेला आहे. पण माजी पोलीसांवर पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबंाड साहेबांनी दाखवलेले प्रेम सय्यद जमीलच्या अंगलट आले आणि त्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले.

आज दुसऱ्या दिवशी सुध्दा त्या वादग्रस्त ठिकाणी काम सुरू आहे. याबाबत सय्यद जमील यांनी वास्तव न्युज लाईव्हला आपली तक्रार पाठवली , त्या जागेवर तयार करून अनेक व्हिडीओ पाठविले, त्यामध्ये तेथे कच्या विटांचे बांधकाम होत आहे. तेथे काम करणाऱ्या मजुरांना सांगितले तर ते सांगतात की, आम्हाला काम करण्यासाठी सांगितले आहे. पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेबांच्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक भुखंड वाद आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *