नांदेड(प्रतिनिधी)-काल झालेल्या गोळीबार प्रकरणातील एकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस.जाधव यांनी 3 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
काल दि.3 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास जुन्या नांदेड भागातील शारदा टॉकीजजवळ गोळीबार झाला. गोळीबाराचा आवाज होताच दहशत माजली. गोळी सचिन कुलथे नावाच्या युवकाला लागली. सचिन कुलथे पाठकगल्ली राहतात. गोळी मारणारे दोन जण होते. त्याची एकाचे नाव गजानन बालाजीराव मामीडवार (36) आणि त्यांचा एक अल्पवयीन बालक अशी आहेत. गोळीबाराची माहिती घेतली असता. काल वेगवेगळे विषय सांगितले जात होते. पण मुळात कोणत्या तरी गाडीचे पैसे भरण्याचा हा वाद होता अशी माहिती आज प्राप्त झाली. सचिन कुलथेच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 34, भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 आणि 7/27 नुसार गुन्हा क्रमांक 37/2023 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवसांब स्वामी यांच्याकडे देण्यात आला.
या प्रकरणातील एक आरोपी हा अल्पवयीन बालक असल्यामुळे त्याची रवानगी बाल न्यायमंडळाकडे करण्यात आली. दुसरा आरोपी गजानन बालाजीराव मामीडवार यास इतवाराचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवसांब स्वामी, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार मांडवकर, गोविंद पवार,मोकले,समीर, यांनी न्यायालयात हजर करून झालेला प्रकार आणि त्याची तपासणी करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता का आहे याचे सविस्तर सादरीकरण केल्यानंतर न्यायाधीश पी.एस. जाधव यांनी मामीडवारला 3 दिवस अर्थात 7 फेबु्रवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
संबंधित बातमी…