नांदेड(प्रतिनिधी)-जुना मोंढा भागातील शारदा टॉकीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास गोळीबार झाला. या गोठीबारात एका युवकाच्या हाताला गोळी लागल्याची माहिती आहे. गोळी मारणारे दोन जण इतवारा पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.
प्रत्यक्षदर्शीनी सांगितलेल्या माहितीनुसार नांदेडच्या जुना मोंढा भागातील शारदा टॉकीजकडे जाणाऱ्या गल्लीच्या रस्त्यावर गोळीबाराचा आवाज झाला. गोळी सचिन कुलथे रा.पथक गल्ली नावाच्या युवकाला लागली आहे. गोळी हातावर लागली असे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून हा गोळीबार झाला आहे. कोणी सांगतात पैशांचा विषय आहे, कोणी सांगतात जागेचा विषय आहे. पण गोळीबार होणे ही घटना भयंकरच आहे. गोळीबार करणाऱ्या लोकांची नावे गजानन बालाजीराव मामीडवार आणि त्याचा मुलगा हिनेश गजानन मामीडवार (15) असल्याचे सांगण्यात आले. गोळीबाराची घटना समजताच पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक श्री.द्वारकादासजी चिखलीकर साहेब,पोलीस निरिक्षक भगवान धबडगे, सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्यपोड, शिवसांब स्वामी, पोलीस उपनिरिक्षक शेख असद, गणेश गोटके, स्थानिक गुन्हा शाखेचे अत्यंत चाणक्ष पोलीस उपनिरिक्षक श्री.गोविंदरावजी मुंडे साहेब तसेच इतर अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. गोळी मारणाऱ्या पिता-पुत्रांना इतवारा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.या मामीडवार हे नामांकित व्यक्तिमत्व आहे.यांच्याविरुद्ध पूर्वी सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत.
आम्हाला अर्थात कॉंगे्रसला शिव्या दिल्याशिवाय मोदीजींचे पोट भरत नाही-खा.खरगे नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी भितीला घृणेत बदलातात आणि त्या बदलाविरुध्द मी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. भारत जोडो यात्रामध्ये चालणे अवघड नसुन सहज आहे. कारण त्यात जनतेची मदत आहे. त्यांच्या मदतीनेच मी पुढे ढकलला जातो. मी स्वत: चालत नाही असे प्रतिपादन कॉंगे्रस नेते […]
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात वेगवेगळे गुन्हे करुन समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या एका गुन्हेगाराला स्थानिक गुन्हा शाखेच्या प्रस्तावानंतर नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यातून हद्दपार केल्याची नोटीस तामील करण्यात आली आहे. हा गुन्हेगार विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे. नांदेड शहरात वेगवेगळे गुन्हे करून समाजात अशांतता निर्माण करणारा गणेश अमरसिंह ठाकूर रा.गुरूनगर, कर्मविरनगर नांदेड याच्याविरुध्द दाखल असलेल्या […]
गोदाघाट येथे नांदेडच्या रसिकांनी अनुभवला गदिमांचा गीतयात्री प्रवास नांदेड (जिमाका) – ज्या घरात ग. दि. माडगूळकर यांची गीते पोहोचली नाहीत असे एकही मराठी माणसाचे घर सापडणे अवघड. कित्येक पिढ्यांच्या मनावर गदिमांची गीते आजही तेवढ्याच तजलतेने भुरळ घालतात. तुझ्या कांतीसग, नाचुनी अति मी थकले, निजरुप दाखवा हो, गंगा आली रे अंगणी, झाला महार पंढरीनाथ, एका तळ्यात […]