नांदेड(प्रतिनिधी)-जगप्रसिद्ध सचखंड गुरुद्वारा नांदेड येथे अखंड लंगर सेवा देऊन उल्लेखनीय काम करीत असल्याबद्दल संतबाबा बलविंदरसिंघजी महाराज यांचा शांतिदूत परिवाराच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय सेवारत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसिएशन शांतिदूत परिवार व आयएएस अकादमी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर व स्पर्धा मार्गदर्शन शिबिरामध्ये मंगळवार दि. 31 जानेवारी 2023 रोजी नरहर कुरुंदकर सभागृह पीपल्स कॉलेज नांदेड येथे आयोजित कार्यक्रमामध्ये पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, विधी सेवा प्राधिकरण सचिव दलजितकौर यांच्या अध्यक्षतेखाली व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष सूर्यतळ, डॉ. तेजस माळवतकर, बापू दासरी, अश्विन जाधव, पोलीस निरीक्षक डॉ.नितीन काशीकर , प्राचार्य डॉ. डी.बी देशमुख, डॉ. अनंत सूर्यवंशी, कृष्णा घोडजकर, राज गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लंगर साहेब गुरुद्वारा नांदेडचे जत्थेदार संतबाबा बलविंदरसिंघजी यांचा राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात हा पुरस्कार संतबाबा बलविंदरसिंघजी यांचे प्रतिनिधी बाबा सूबेकसिंघ यांनी स्वीकारला. संतबाबा बलविंदरसिंघजी यांचे रवींद्रसिंघ मोदी ,प्रितपालसिंघ शाहू, जगदीपसिंघ नंबरदार, राजेंद्रसिंघ पुजारी, रणजीतसिंघ गिल, मनप्रितसिंघ कुंजीवाले, हरभजनसिंघ दिघवा यांच्यासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
