1 राखीव पोलीस निरिक्षक, दोन पोलीस उपनिरिक्षक, तीन श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, पाच पोलीस अंमलदार सेवानिवृत्त
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलातून आज आपला विहित सेवा कालावधी पुर्ण करून सेवानिवृत्ती घेतलेल्या राखीव पोलीस निरिक्षकांसह दोन पोलीस उपनिरिक्षक तीन श्रेणी पोलीस उपनिरिक्षक दोन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि 5 पोलीस अंमलदारांना निरोप देतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तुमच्या भविष्यातील जीवनात येणाऱ्या अडचणींसाठी संपुर्ण नांदेड जिल्ह्याचे पोलीस दल कायम तयार राहिल असे सांगून त्यांना सहकुटूंब सन्मान करून निरोप दिला.
काल दि.31 जानेवारी रोजी आपल्या पोलीस दलातील विहित सेवा काळाचा पुर्ण कारभार संपल्यानंतर राखीव पोलीस निरिक्षक, दोन पोलीस उपनिरिक्षक, तीन श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि पाच पोलीस अंमलदार अशा 13 जणांना आज 1 फेबु्रवारी रोजी सहकुटूंब पोलीस अधिक्षक कार्यालयात बोलावून त्यांचा सहकुटूंब त्यांचा सन्मान करून त्यांना निरोप देण्यात आला. सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे आहेत. राखीव पोलीस निरिक्षक शामराव देवला राठोड (पोलीस मुख्यालय), पोलीस उपनिरिक्षक बाबू तुकाराम केंद्रे(पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण), मोहम्मद तय्यब अब्बास (पोलीस ठाणे अर्धापूर), श्रेणी पोलीस उपनिरिक्षक लक्ष्मण यादवराव ईजळकर (पोलीस ठाणे वजिराबाद), सुभाष म्हाराजी चोपडे, त्रिलोकसिंघ निरंजनसिंघ सरदार (पोलीस मुख्यालय नांदेड), सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मारोती गणपतराव किडे(पोलीस ठाणे बारड), नवनाथ एकनाथ भारती (पोलीस मुख्यालय), पोलीस अंमलदार रघुनाथ दिगंबरराव वानखेडे, गणपत नागोबा बेंबरे (पोलीस मुख्यालय), भारत विठ्ठलराव गायकवाड(पोलीस ठाणे देगलूर),वसंत हरलाल राठोड(पोलीस ठाणे किनवट), उमेश सोमा राठोड (पोलीस ठाणे शिवाजीनगर) असे आहेत.
यांना निरोप देतांना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले आजपर्यंत तुम्हाला साहेब काय म्हणेल, मातहत ऐकणार नाहीत त्यामुळे पुन्हा साहेब काही तरी बोलेल अशा भितीमध्ये जीवन जगावे लागले. आता अत्यंत मुक्तपणे आणि स्वतंत्र पणे आपले जीवन जगा, आपल्या कुटूंबाचे लक्ष ठेवा, आपल्या आणि कुटूंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्या, यानंतर सुध्दा तुमच्या जीवनात काही अडचणी आल्या तर पोलीस दलाशी संपर्क साधा. ज्याप्रमाणे तुम्ही जनतेला मदत केली आहेत त्याचप्रमाणे आम्ही तुमची मदत करू. नांदेड जिल्हा पोलीस दला आपल्या हाकेला सदैव सकारात्मक प्रतिसाद देईल.
या कार्यक्रमात पोलीस उपअधिक्षक मुख्यालय, डॉ.अश्र्विनी जगताप, पोलीस कल्याण विभागातील सहाय्यक पोलीस निरिक्षक कमल शिंदे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अधिक्षक कार्यालयातील इतर शाखांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस अंमलदार हजर होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले. कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्याची जबाबदारी जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे यांनी पार पाडली.पोलीस अंमलदार राखी कसबे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
