नांदेड(प्रतिनिधी)-समाजात सुधार करण्याच्या गप्पा व्यासपीठावरून अनेक जण मारतात. समाजातील चुकीच्या व्यवहारासाठी बरेच कायदे अस्तित्वात आहेत. काही ठिकाणी ते कायदे पाळण्याची जबाबदारी संबंधीत दुकानदारांवर, प्रतिष्ठानांवर आहे. काही ठिकाणी कायद्याच्या अनुरूप फलके लावली जातात. परंतू त्यांचे प्रत्यक्षात येणे कधीच दिसले नाही. असाच एक प्रकार शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ दिसतो.कोणतेही प्रशासन यावर लक्ष देत नाहीत आणि म्हणूनच अल्पवयीन बालकांना चुकीच्या सवयी लागत आहेत आणि या चुकीच्या सवई त्या बालकांच्या माध्यमातून समाजाला त्रासदायक ठरणार आहेत. प्रसार माध्यमांमध्ये चुकीच्या बाबतींना उघड करून त्यावर आक्षेप घेण्याची जी प्रथा अस्तित्वात आहे त्या प्रथेअनुरूप वास्तव न्युज लाईव्ह आपले हे लिखान वाचकांसाठी प्रसिध्द करत आहे.
भारताच्या कायद्याचा पाया भारतीय संविधानावर उभारलेला आहे. यासोबतच काही सामाजिक कायदे आहेत. त्यांना प्रथा असे म्हणतात. प्रथा म्हणजे सुध्दा कायदेच आहेत. काही कायद्यांना अंमलात आणण्यासाठी त्या संदर्भाची फलके आप-आपल्या प्रतिष्ठांणासमोर लावणे आणि त्या अनुरूप कार्यवाही करणे ही जबाबदारी त्या प्रतिष्ठांवर देण्यात आलेली आहे. त्या जबाबदारीनुसार आम्हाला, वाचकांना काही ठिकाणी 18 वर्षाखालील मुलांना प्रवेश बंद, 18 वर्षाखालील मुलांना…. दिले जाणार नाही, 18 वर्षाखालील मुलांनी पाहु नये असे अनेक फलक दिसतात. या फलकांच्या अनुरूप त्या प्रतिष्ठाणामध्ये कार्यवाही होते की, नाही याचा अभ्यास केला तर मात्र अत्यंत दुर्देवी चित्र दिसते. अनेक मधुशालांमध्ये अल्पवयीन बालके मद्याचा आस्वाद घेतांना दिसतात. अनेक चित्रपटांमध्ये वयस्कांसाठी असे शब्द लिहिलेले असतात. त्याही चित्रपटगृहांमध्ये अल्पवयीन बालके दिसतात. वास्तव न्युज लाईव्ह आम्हाला यातून काय करायचे आहे या सर्वसामान्य विचाराला त्यागून अशा चुकीच्या घटनांचा उल्लेख सार्वजनिक करून जागरुकता करण्याची इच्छा ठेवूनच हे शब्द संचय वाचकांसमोर मांडत आहे.
चित्रपटगृहात जातांना अगोदर टिकीट घ्यावे लागते. टिकीट देणारा बालकाचे वय न पाहताच त्याला तिकिट देतो. मदिरालयात जातांना मालक समोरच बसलेला असतो पण तो अल्पवयीन बालकांना तु कशाला आलास असे प्रश्न विचारत नाही. याची जबाबदारी कोण घेणार. प्रशासनाच्यावतीने अशा घटनांवर कोण लक्ष ठेवणार या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे एक मोठे दिव्य आहे आणि कोणी शोधलेच तर त्या उत्तर शोधणाऱ्याला समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागते. या सर्व बाबींना लक्षात ठेवूनच वास्तव न्युज लाईव्ह आपल्या समोर उपलब्ध झालेल्या एका छायाचित्राच्या आधारावर पुढील घटना मांडत आहे.
धुम्रपान करणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे असे सिगारेट पॉकिटवर लिहिलेच असते. आजच्या परिस्थितीत तर या धुम्रपानामुळे होणाऱ्या कर्करोगाचे छायाचित्र सुध्दा सिगारेट पॉकिटवर प्रसिध्द केले जाते. पण ही सिगारेट विक्री करणाऱ्या काही जागांवर सिगारेट गुपचूप पिण्यासाठी काही कक्ष तयार आहेत. असे कक्ष विमानतळावर पाहायला मिळतात. विमानात जात असतांना कोणताही ज्वलनशिल पदार्थ सोबत नेता येत नाही म्हणून माचिस, लायटर आदी वस्तु सुरक्षा कवचात ओळखल्या जाता आणि त्या काढून घेतल्या जातात. विमानतळांवर विमान उड्डाणाच्या कमीत कमी दोन तास अगोदर जावे लागते आणि त्यावेळेस कोणाला सिगारेट पियायची असेल तर त्यासाठी विशेष कक्ष तयार आहेत. तेथे ती सुविधा उपलब्ध आहे.
पण या सुविधा आता सर्वसामान्य जागी सुध्दा उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून शाळकरी मुले सुध्दा सिगारेटच्या नादी लागली आहेत. एखाद्या पानपट्टीवर कोणत्याही अल्पवयीन बालकाने सिगारेट मागितली तर पान पट्टी मालकाची ही जबाबदारी आहे की, त्याला त्याने सिगारेट देऊ नये. दिलीच तर ती त्याच्या वडीलांसाठी असावी याची खात्री करावी. पालकांनी सुध्दा अल्पवयीन बालकांच्या हाताने सिगारेट मागवू नये. शिवाजीनगर भागात अशाच एका पानपट्टीमधून सिगारेट घेवून शाळेचा गणवेश घातलेला एक अल्पवयीन बालक सिगारेट पेटवितांनाचे छायाचित्र प्राप्त झाले. हे छायाचित्र पाहिल्यानंतर असे वाटले की, यावर काही जनजागृती होणे आवश्यक आहे. काही हराम्यांनी 60 वर्षाच्या माणसातील सिगारेट पिण्याच्या सवईला उल्लेखीत करून आम्ही लई भारी पत्रकार आहोत असे दाखविण्याचा केलेल्या प्रयत्नापेक्षा वास्तव न्युज लाईव्ह अल्पवयीन बालकांनी सिगारेटच्या नादी लागू नये हा मुद्दा मांडणे म्हणजे त्या हराम्यांना दिलेले उत्कृष्ट उत्तर आहे. हे हरामी इतरांकडून भिक मागून .. डा पितात त्याबदल त्यांनी कधी लिहिले नाही.समाजातील महिलांना त्रास देऊन आपले चुकीचे उद्देश पुर्ण करणाऱ्यांनी कधी यावर लिखाण केले नाही. याचीही जाणीव वास्तव न्युज लाईव्हच्या वाचकांनी ठेवायला हवी.
वास्तव न्युज लाईव्हची बातमी वाचलेल्या सर्वच पालकांना वास्तव न्युज लाईव्हची नम्र विनंती आहे की आपल्या बालकांना काही खर्चासाठी पैसे देतांना त्यातून सिगारेट खरेदी करणार नाहीत याचे वचन घेवूनच त्यांना पैसे द्या. नसता त्यांच्यावर बारकाईने निरिक्षण ठेवा नाही तर भविष्याची ही पिढी आजच सिगारेटच्या नादी लागली तर त्यांचे जीवन नरकापेक्षा वाईट होईल.
