नांदेड,(प्रतिनिधी)- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद द्वारा पुरस्कृत विकासार्थ विद्यार्थी ह्या आयामा अंतर्गत माघ शुध्द दशमी ह्या दिवशी गोदावरी नदीचा अवतरण दिन साजरा करण्यात आला हा उपक्रम अभाविप २०१७ पासुन राबवत आहे. याचा प्रसार व प्रचार जनमानसात व युवा पिढी पर्यत पोहचावा व नदी हि आपली जीवनदायीनी असुन तिचे संरक्षण व संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. हा त्या मागील उद्देश आहे.
गोदावरी अवतरण दिनाच्या पुर्व संध्येला प्रमुख मान्यवर म्हणुन गंगाविचार मंच चे राष्ट्रिय संयोजक भरत पाठक हे उपस्थित होते. या प्रसंगी त्यांनी नही रूकेंगे,स्वच्छ करेंगे असा नारा देते नमामी गंगे प्रमाणे सर्व नद्यांचे अस्तित्व अबाधित राखणे व त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे असे सांगितले.
ह्या वेळी नमामी गंगे ह्या उपक्रमात गोदावरी नदीचा हि समावेश करावा असे निवेदन भरत पाठक ह्यांना समस्त नांदेड वासीयांच्यावतीने देण्यात आले. ह्यावेळी कार्यक्रमाचा मुळ उद्देशाला अनुरूप असे संरक्षण व संवर्धन हा विचार कृतीशीलतेतुन मनामनात रूजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानुसार सर्व माता भगिनीच्या हस्ते गौमय दीप दान करण्यात आले. ओटीचे सामान गोदावरी नदीत अर्पण न करता ते प्रतिकात्मक स्वरूपात प्रतिमे पुढे करुन सर्वानी ओटी भरली ,ओटीतील ही सामग्री गरजू लोकांना देण्यात येणार आहे . तर ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून विकासार्थ विद्यार्थी (SFD) राष्ट्रीय सहसंयोजक मयुर जव्हेरी हे उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाचे सुञसंचलन सौ. योजना कौलवार ह्यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सनतकुमार महाजन , गणेश बोडके , सर्वेश पिंपराळे , श्रीराज चक्रावार ,अंकिता कामतीकर ,सतीश भोळे , शुभम मोहरे , राजु नरवाडे , वैष्णव मोतीवाड , मोहन मोरे , यांनी परिश्रम घेतले.
नांदेड(प्रतिनिधी)-मौजे सुजलेगाव ता.नायगाव येथील शेतजमीनीवर असलेला बोजा काढून घेण्याकरीता 2 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याविरुध्द नायगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुजलेगाव गावातील सुभाष गंगाराम नव्हारे (49) यांच्यासह अनेक जणांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.12 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 ते 2.30 या वेळेदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर रस्त्यावर नायगाव येथे सुजलेगाव येथे राहणारा व्यक्ती राजरत्न सटवाजी डुमणे याने […]
नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी हत्याकांडातील आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर एका आरोपीने मागितलेला जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी याप्रकरणातील आरोपीविरुध्द मकोका कायदा रद्द केला गेला नाही अशी नोंद आपल्या निकालपत्रात करत त्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. दि.5 एप्रिल 2022 रोजी शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायीक संजय बालाप्रसाद बियाणी यांची दोन मारेकऱ्यांनी हत्या केली होती. त्या प्रकरणातील […]
नांदेड(प्रतिनिधी)-मार्केट यार्ड नवीन मोंढा येथून सोयाबीन भरलेले 60 किलो वजनाचे सहा पोते चोरल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी अत्यंत जलद कार्यवाही करत दोघांना अटक केली आहे. मगनपुरा भागात राहणारे बालाजी दत्तराम कोसडे यांची मार्केट यार्डमध्ये संकल्प ट्रेडींग कंपनी नावाची दुकान आहे. दि.14 जुलै रोजी रात्री त्यांच्या दुकानासमोर टीनशेडमध्ये ठेवलेले 60 किलो वजनाचे सोयाबीन भरलेले सहा पोते, 21 […]