नांदेड (प्रतिनिधी)-मुद्रांक विके्रता संघटनेची नूतन नांदेड जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली़ यात जिल्हाध्यक्षपदी सुभाष चावरे, उपाध्यक्ष सोपानराव कांबळे व पत्रकार सुनिल पारडे, कोषाध्यक्षपदी चंद्रमुणी सावंत यांची तर सचिवपदी गजानन पईतवार यांची निवड करण्यात आली़.
जेष्ठ मुद्रांक विके्रते किशनराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी निवडीसाठी बैठक घेण्यात आली़ या बैठकीत सर्वानूमते मुद्रांक विके्रता संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष चावरे, उपाध्यक्ष सोपानराव कांबळे व पत्रकार सुनिल पारडे यांची तर सचिवपदी गजानन पईतवार यांची निवड झाली़ उर्वरित कार्यकारिणीत कोषाध्यक्षपदी चंद्रमुणी सावंत, कार्याध्यक्ष विनायक रेवलकर, सल्लागार किशनराव सावंत, शरद सोनवणे, मुंजाजी झुंझूरवार व कार्यकारिणी सदस्य म्हणून गजानन गिरगावकर, विकास लव्हेकर, सुरेश राजूरकर, कमलकिशोर उपाध्याय, माधव गोवंदे, मुजीबखान मुस्तफाखान, प्रमोद सावते, संभाजी शिंदे, मन्सूरखान महेबूबखान, मो़ नईमोद्दीन, सौ़ उषा सुमशचंद्र शर्मा, अनिता सुदेश पईतवार, सौ़ एस़एस़ स्वामी, जितेंद्र लोखंडे, सय्यद मुस्ताक, आनंदा कचरे, राजू गायकवाड, विनायक गायकवाड व जिल्हयातील मुद्रांक विके्रत्यांची निवड करण्यात आली़ बैठकींनतर या नूतन कार्यकारिणीचा सहदुय्यम निबंधक कार्यालय परिसरात सत्कार करण्यात आला.