ताज्या बातम्या महाराष्ट्र

डॉ. सान्वी जेठवानी भारतीय संविधान जनजागृती रक्षक 2023 पुरस्काराने सन्मानित

नांदेड (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासन उपक्रम असलेलं महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती मुंबई यांच्या वतीने कोल्हापूर येथे 74 वे गणतंत्र दिवसानिमित्त संविधान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत विविध मान्यवरांना भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये डॉ. सान्वी जेठवाणी यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं त्याबरोबरच भारतीय लोकशाही बळकटीस होण्यासाठी तृतीयपंथांसाठी देत असलेले लढा व अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी निस्वार्थ त्यांची धडपड पाहता सदरील महोत्सव समितीने त्यांना भारतीय संविधान जनजागृती रक्षक 2023 पुरस्कार देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक सभागृह मध्ये सन्मानित करण्यात आलं.

मंचावरून बोलत असताना डॉ सान्वी यांनी कोल्हापूर मध्ये मिळत असलेल्या राजर्षी शाहू यांच्या स्मारक मध्ये होत असलेल्या या कार्यक्रमात आपल्याला अभिमान वाटत असल्याचं सांगितलं भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी मोलाचा वाटा दिलेला आहे व तृतीयपंथी जोगती समाज भटकती समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अनेक दान दिलेले आहेत हे सर्व पाहत असताना आपल्याला प्रेरणा मिळाली आहे अशा ऐतिहासिक शहरामध्ये आपल्याला पुरस्कार मिळत असून जबाबदारी वाढली आहे किंवा आणखीन काम करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे असे त्यांनी आपल्या भाषणातून नमूद केले. आज इतर लिंग असलेले विविध मंडळी देशभरामध्ये वावरत आहेत त्यांना समाजामध्ये मान मिळावा म्हणून त्यांनी नांदेड वासियांकडून प्रेरणा घ्यावी असेही त्यांनी मत व्यक्त केले कारण भरत म्हणून एक कलावंतांचा जो मानसन्मान मला मिळत होता तो आज सानवी म्हणून देखील तेवढेच मान सन्मान नांदेडकरांकडून मिळत आहे ही बाब कौतुकास्पद असल्याची त्यांनी उपस्थित सर्व पाहुणे मंडळींना सांगितलं.

या कार्यक्रमा ला जाण्यापूर्वी दिनांक 25 जानेवारी 2023 ज्याला राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून भारतात ओळखला जातो त्यादिवशी श्रीमती नाथी बाई दामोदरराव ठाकरसी विद्यापीठ व मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त त्यांना निवडणूक धूत म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयोग श्री देशपांडे यांनी सान्वी जेठवणी यांचे कार्याचे कौतुक केले व अनेक तृतीयपंथांना व कलावंतांना प्रोत्साहन देत मतदार जनजागृती चा कार्यक्रम पुणे मुंबई येथे करत असल्याचा त्यांना निवडणूक धूत म्हणून निवड केल्याची त्यांनी मंचावरून सांगितलं. यावेळेस मुंबई शहराचे जिल्हाधिकारी यांनी सांन्वी जेठवाणी यांना लोकशाही वर आधारित पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केलं. यावेळेस भाषण करताना डॉ जेठवाणी यांनी म्हटलं लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्ती खूप महत्त्वाची आहे मग तिचे लिंग, लैंगिक प्रवृत्ती, वंश किंवा धर्म कुठलाही असो या सर्वाच्या पलीकडून आपण एक मानव आहोत. लोकशाहीमध्ये सर्वांचा समावेश होतो कारण लोकशाही हा समाजवादाचा मार्ग आहे त्यामुळे सर्वांनी आपण समाजाचा भाग समजून मतदान करावं मतदान हा केवळ आपला अधिकार नसून तर आपली शक्ती आहे जे उद्याच भारत आणि भविष्य आपल्या हातून घडवत असते.

यावेळेस राष्ट्रीय सेवा योजना व मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही दिंडी सकाळी विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आली याचे उद्घाटन सान्वी जेठवाणी यांच्या हस्ते हिरवं झेंडा दाखवून करण्यात आलं.

लवकरच डॉ. सान्वी जेठवाणी यांना मुख्य निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने भारताचे निवडणूक धूत म्हणून निवड होण्याचं पत्र प्राप्त होणार आहे आणि पुढे ते युवकांना व सर्वांना मतदान हक्क बजावण्यासाठी प्रेरित करण्याचे काम करणार आहेत अशी ग्वाही दिली आणि नांदेड चे नाव देशपातळीवर एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम विविध माध्यमाने ते करत आहेत याचा सार्थ नांदेडकरांना अभिमान वाटतो.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *