नांदेड(प्रतिनिधी)- आज पोलीसांनी दिलेल्या गुन्ह्यांच्या माहितीमध्ये जिल्ह्यात अनेक जागी जुगार कायद्याचे गुन्हे दाखल करण्यात आले पण नांदेड ते पुर्णा जाणाऱ्या रस्त्यावर एका ढाब्याच्या शेजारी एक मोठा 52 पत्यांचा जुगार अड्डा सुरू आहे.या अड्ड्यावर मात्र कार्यवाही का झाली नाही हा प्रश्न आणि त्याचे उत्तर दोन्ही बाबी सक्षम अधिकाऱ्यांनी पाहाव्यात असे वाटते.
आज पोलीसांनी दिलेल्या माहितीमध्ये जिल्हाभरात अनेक ठिकाणी मटका जुगार, 52 पत्यांचा जुगार आदी घटनांवर पोलीसांनी कार्यवाही करुन गुन्हे दाखल केले. त्याची माहिती प्रसिध्दीसाठी पाठवली. तरीपण नांदेड शहरातील पोलीस ठाणे भाग्यनगरची हद्द संपल्यानंतर चुडावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ढाब्याच्या शेजारी 52 पत्यांचा एक जुगार अड्डा जोमात सुरू आहे. कोणाच्या दमावर हा जुगार अड्डा चालतो ? हे खुप महत्वपुर्ण आहे. या जुगार अड्यावर येणारी मंडळी कुठून येते, या जुगार अड्ड्याच्या नफ्याचे भागिदार कोण-कोण आहे याचा शोध शेवटी पोलीसांनाच घ्यायचा आहे. पण कधी लागेल हा शोध याचा उत्तर मात्र उपलब्ध होत नाही.
