नांदेड(प्रतिनिधी)-चिखलभोसी ता.कंधार गावात एकाच रात्री तिन घरांमध्ये चोरी करून चोरट्यांनी 1 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.शहरातील मगनपुरा भागातून एका 69 वर्षीय महिलेच्या गळ्यातून 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याची माळ चोरट्यांनी लंपास केली आहे. मनाठा गावातून एका घरात ठेवलेले 7 क्विंटल कापूस 50 हजार रुपये किंमतीचे दोन जणांनी चोरले म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.
चिखलभोसी ता. कंधार येथील शिवहर लक्ष्मणराव किडे यांनी दिलेल्या तक्ररीनुसार 27 जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर 2.45 वाजेच्यासुमारास त्यांच्या आणि गावातील रावसाहेब शंकर वरपडे आणि विठ्ठल बालाजी वरपडे अशा तिघांच्या घरात चोरी झाली या चोरीत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. लोहा पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 14/23 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शेख यांच्याकडे देण्यात आला आहे.
शिक्षक संतोष लक्ष्मणराव सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जानेवारीच्या सकाळी 8 ते 25 जानेवारीच्या सकाळी 10 वाजेदरम्यान गावातील त्यांच्या घरात ठेवलेले 7 क्विंटल कापूस नवी अबादी मनाठा येथे राहणारे अविनाश राजू वाघमारे (22), करण बाबूराव भिसे (20) यांनी चोरून नेले आहे. या प्रकरणी मनाठा पोलीसांनी गुन्हा क्रमांक 13/23 दाखल केला आहे. पोलीस अंमलदार गिरी अधिक तपास करीत आहेत.
शैला दजूलाल चांडक (69) या महिला मगनपुरा, नवा मोंढा येथून 27 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता देवदर्शनासाठी घराबाहेर निघाल्या. त्या मंदिराकडे जात होत्या. पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ तोडली. त्याची किंमत 60 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 25/23दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक रोडे अधिक तपास करीत आहेत.
