नांदेड(प्रतिनिधी)-एका 45 ते 50 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी त्या महिलेच्या नातलगांचा शोध लागावा म्हणून शोध पत्रिका जारी केली आहे.
दि.26 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास शेख सलमान शेख जावेद या युवकाने खबर दिली की, बंदाघाट जवळच्या गोदावरी नदीपात्रात एक 45 ते 50 वर्षवयोगटाच्या महिलेचा मृत्यदेह दिसत आहे. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 174 प्रमाणे आकस्मात मृत्यू क्रमांक 7/23 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार बापूराव डवरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
मरण पावलेल्या महिलेची ओळख पटावी म्हणून पोलीसांनी शोध पत्रिका जारी केली आहे. मरण पावलेल्या महिलेचे वय45 ते 50 वर्ष आहे. त्यांचा रंग सावळा आहे, चेहरा लांबट आहे, उंची 164 सेमी आहे, बांधा मजबुत आहे, केस काळे आणि लांब आहेत, नाक सरळ आहे, त्यांच्या शरिरावर हिरव्या रंगाचा ब्लाऊज, राखोंडी रंगाची साडी, ज्यावर गुलाबी ठिपके दिसत आहेत असा परिधान आहे.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या अनोळखी मयत महिलेची ओळख पटण्यासाठी जनतेने मदत करावी. जनतेला यापैकी काही माहिती असेल तर त्यांनी पोलीस ठाणे वजिराबाद येथील दुरध्वनी क्रमांक 02462-236500, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांचा मोबाईल क्रमांक 9923696860 आणि पोलीस अंमलदार तथा या प्रकरणाचे तपासीक अंमलदार बापूराव डवरे यांचा मोबाईल क्रमांक 9923619820 यावर सुध्दा माहिती देता येईल.