नांदेड(प्रतिनिधी)-बैल बाजार नायगाव येथे 23 जानेवारीच्या रात्री 9.30 ते 24 जानेवारीच्या सकाळी 8.15 वाजेदरम्यान एक बेशुध्द अवस्थेत सापडलेल्या माणसावर कोणी तरी जिवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल बालाजी कदम रा.शेळगाव छत्री ता.नायगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील बालाजी गंगाधर कदम (50) हे गाडीवर चालक म्हणून काम करतात. दि.24 जानेवारी रोजी सकाळी बैलबाजार नायगाव येथे ते रक्तभंबाळ अवस्थेत आणि बेशुध्द अवस्थेत सापडले. इतरांच्या मदतीने त्यांना दवाखान्यात पाठविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माझ्या वडीलांवर कोणी तरी अज्ञात माणसांनी अज्ञात कारणासाठी जिवघेणा हल्ला केला आहे. नायगाव पोलीसांनी हा जिवघेणा हल्ला प्रकार गुन्हा क्रमांक 8/2023 नुसार दाखल केला असून नायगावचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे अधिक तपास करीत आहेत.
