नांदेड(प्रतिनिधी)-आज स्वतंत्रता सैनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलीस विभागाने या दोन महापुरूषांना अभिवादन केले.
23 जानेवारी हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन. आज पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी अशा सर्वांनी या दोन महापुरूषांना पुष्पअर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क विभागातील पोलीस उपनिरिक्षक उत्तम वाघमारे, पोलीस अंमलदार सुर्यभान कागणे, शामका पवार, विनोद भंडारे आदींनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
