नांदेड,(प्रतिनिधी)- आज ‘तुम खुन दो मैं तुम्हे आजादी दूंगा’ म्हणणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंतीदिनी नांदेड शहरातील नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालयाने रॅली काढून त्यांना अभिवादन केले
भारतीय स्वातंत्र्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 126 वि जयंती साजरी करताना नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, एनसीसीचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा दलाचे विद्यार्थी आणि इतर विद्यार्थी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा असलेल्या गाडीसह रॅली काढली.या रॅलीत वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणांनी आसमंत दुमदुमले. हि रॅली शहरभर फिरून पुन्हा नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात विसावली.