क्राईम ताज्या बातम्या

शेअरमार्केटची थाप देवून मुख्याध्यापकाची 1 कोटी 15 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-शेअर मार्केटबद्दल चुकीची माहिती देवून 1 कोटी 14 लाख 53 हजार 700 रुपयांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद नागनाथराव रेणगुंटवार हे मुख्याध्यापक आहेत. सन 2019 मध्ये ते पंढरपूर येथे एका लग्नासाठी गेले असतांना त्यांची भेट बाबूराव हजारे नामक व्यक्तीशी झाली. त्या बाबूराव हजारेंनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे अनेक खोटे अमिष आनंद रेणगुुंटवार यांना दाखवले. त्यात गुंतवणूक केली तर भरपूर फायदा मिळतो असे आमिष दाखवले. त्यानुसार 2021 आणि 2022 या कालखंडात आनंद रेणगुंटवार या मुख्याध्यापकांनी केलेली गुंतवणूक कालीच परतावा न देणारी ठरली आणि त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. मुख्याध्यापक आनंद रेणगुंटवार यांच्या तक्रारीवरुन बाबूराव हजारे, लोहितसिंग धरमासिंग सुबेदार, शिवाजी गणपती हजारे, बाबूसा भुपाल धनगर, इंद्रजित भारत म्हाळंगे अशा पाच जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420, 120(ब) आणि सोबत ठेवीदार संरक्षण अधिनियम 1999 च्या कलम 3, 4, 5 नुसार वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 18/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *