नवीन नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड येथील नारायणा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या ३रा वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपास शिबिराचे व डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या नांदेड येथील वैद्यकीय सेवेचा ४६ वया वर्धापनदिन दिनानिमित्त आयोजन उद्या रविवार दिनांक २२ जानेवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नारायणा हॉस्पिटल परिसरात सर्व रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे .
या शिबिराचे उद्घाटन नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाने हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हैदराबाद येथील छाती विकार तज्ञ डॉ. चंद्रकांत टरके यांची उपस्थिती राहणार आहे. या मोफत आरोग्य तपासून शिबिरात ECG, CBC, TSH, S.Creatinine, rbs : सुपर लिस्ट धन्यवाद फिजिशियन कडून तपासणी व उपलब्धप्रमाणे औषधे मोफत देण्यात येणार असून या शिबिरात तज्ञ डॉ. व्यंकटेश काब्दे, डॉ. विजय मिसाळे, डॉ.अजित काब्दे(हृदयरोग तज्ञ) डॉ. चैतन्य येरावार, डॉ. आदिती काब्दे (थायरॉईड मधुमेह इंडोक्राईम तज्ञ) डॉ. पंकज राठी (मेंदूविकार तज्ञ) डॉ.कैलास कोल्हे (पोटविकार तज्ञ) डॉ. गोविंद भट्टड, डॉ. अमोल गोरे, डॉ.गणेश काळे, डॉ. शिमान अन्सारी, डॉ. फरीन, डॉ.रेणुका बांगर, डॉ.अश्विनी कुरे, डॉ. हरि वानोळे (फिजिशियन व अतिदक्षता विभाग तज्ञ) डॉ.विनोद साबू, डॉ.गिरीराज बोंडले(रेडीयोलॉजिस्ट) असून रुग्णांनी पूर्व नोंदणी ७०२८८४४६४६ या नंबरवर करणे आवश्यक आहे.