नांदेड(प्रतिनिधी)-19 जानेवारी रोजी सापडलेल्या 65 वर्षीय अनोळखी पुरूष व्यक्तीची ओळख पटावी म्हणून वजिराबाद पोलीसांनी त्या संदर्भाची शोध पत्रिका प्रसार माध्यमांना पाठवली आहे.
दि.19 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता संजय पुरभाजी पुंडगे यांनी खबर दिली की, कलामंदिर येथील मोकळ्या मैदानात एक 65 वर्षीय व्यक्ती मरण पावलेल्या आवस्थेत पडलेला आहे. या संदर्भाने वजिराबाद पेालीसांनी आकस्मात मृत्यू क्रमांक 6/2023 दाखल केला आणि त्या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार अनिल झांबरे यांच्याकडे देण्यात आला.
याबाबत हा 65 वर्षीय व्यक्ती मरण पावलेल्या अवस्थेत सापडला आहे. त्याचा रंग सावळा आहे. चेहरा लांबट आहे. उंची 5 फुट आहे . बांधा सडपातळ आहे. केस पांढरे, साधारण कापलेले आहेत. नाक सरळ आहे. मृत्यूच्यावेळी या अनोळखी माणसाच्या अंगात फुल बाह्यांचा गुलाबी रंगाचा शर्ट, त्यावर हाप बाह्यांचे काळपट पांढऱ्या रंगाचे स्वेटर आणि भुरकट रंगाचा पॅन्ट परिधान केलेला आहे.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या अनोळखी मयत अवस्थेत सापडलेल्या 65 वर्षीय व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती असेल तर त्याबाबत त्यांनी पोलीस ठाणे वजिराबाद येथे माहिती द्यावी. पोलीस ठाणे वजिराबाद येथील दुरध्वनी क्रमांक 02462-236500, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांचा मोबाईल क्रमांक 9923696860 आणि पोलीस अंमलदार अनिल झांबरे यांचा मोबाईल क्रमांक 9923922533 यावर सुध्दा ही माहिती देता येईल.
