नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेतील सर्वात जबरदस्त फौजदार डॉ.परमेश्र्वर चव्हाण यांनी धर्माबादमध्ये छापा टाकून अत्यंत धाडसी कार्यवाही केली. त्यात 3 हजार 430 रुपये रोख रक्कम पकडून मटक्याचा जुगार अड्डा उध्दवस्त केला.
19 जानेवारी रोजी शासकीय वाहन आणि चार मदतनिस घेवून स्थानिक गुन्हा शाखेतील अत्यंत जबदरस्त फौजदार डॉ.परमेश्र्वर ठाणुसिंह चव्हाण यांनी धर्माबाद गाठले आणि दुपारी 2 वाजता तेथे ऐलोरा वाईन मार्टसमोर सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकला आणि अत्यंत त्वरीत प्रभावाने दुपारी 3.52 वाजता धर्माबाद पोलीस ठाण्यात जुगार चालविणाऱ्या संतोष देवानंद वाघमारे (22) आणि रोकडेश्र्वर शिवराज जारीकोटे (19) या दोघांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) नुसार मोठी कार्यवाही केली. धर्माबाद पोलीसांनी या मोठ्या कार्यवाहीचा तपास पोलीस अंमलदार स्वामी यांच्याकडे दिला आहे. या प्रकरणात एकूण 3 हजार 430 रुपये अशी मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे.
