नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या दोन बालकांना विहिरीत फेकून देणाऱ्या वैरिणी मातेला देगलूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
गुती तांडा मानुर ता.देगलूर येथील एका वैरिणी मातेने आपल्याच दोन बालकांना ज्यामध्ये अडीच वर्षाचा मुलगा आणि तीन महिन्यांची मुलगी अशा दोघांना एका शेतातील विहिरीत फेकून दिले. या वैरिणी मातेच्या इच्छेप्रामणे तिचा नवरा तिला सोबत घेवून हैदराबाद येथे राहत नसल्याचा राग होता. काही जण सांगतात ही सुनबाई आपल्या सासू-सासऱ्यांना सुध्दा मारहाण करत होती.मुलांना विहिरीत फेकतांना या निर्दयी मातेने अगोदर अडीच वर्षाच्या बालकाला अगोदर विहिरीत फेकले आणि तीन महिन्याच्या बालिकेला आपल्या कंबरेला बांधून स्वत: सुध्दा उडी घेतली. हा प्रकार 19 जानेवारीच्या दुपारी 12 ते 1 या वेळेदरम्यान घडला. या घटनेत छोटा बालक आणि बालिका या दोघांचा मृत्यू झाला. पण वैरिणी माता वाचली. तिचा पती संतोष पांडू आडे याने दिलेल्या तक्रारीनुसार मरखेल पोलीसांनी ती महिला पुजा संतोष आडे विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 309 प्रमाणे गुन्हा क्रमांक 17/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक विष्णुकांत गुट्टे हे करीत आहेत.
आज 20 जानेवारी रोजी विष्णुकांत गुट्टे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारानंी पुजा संतोष आडेला देगलूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून तपासासाठी मागितलेली पोलीस कोठडी न्यायालयाने एक दिवसासाठी मंजुर केली आहे.
