नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद येथील बसस्थानकातून एका 66 वर्षीय महिलेच्या बॅगमधील 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरीला गेले आहेत. तसेच उदगीर ते देगलूर या प्रवासादरम्यान एका सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या बॅगमधून 1 लाख 14 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरीला गेले आहे. दोन्ही ऐवजांची किंमत 3 लाख 94 हजार रुपये होते.
रमादेवी इरेशाम मरगेवार रा.देगलूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 जानेवारी रोजी सकाळी 11.30 ते 12 वाजे दरम्यान आपल्या खांद्याला पर्स अडकवून त्या बस मध्ये प्रवेश करत असतांना त्यांच्या पर्समधील तीन तोळे वजनाचा सोन्याचा पोहेहार, सोन्याच्या मनीची माळ असे एकूण 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेल आहेत. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार अधिक तपास करीत आहेत.
दि.18 जानेवारी रोजी दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यान उदगीर ते देगलूर कॉलेज असा प्रवास करतांना सेवानिवृत्त प्राध्यापक कन्हैयालाल धांदु यांच्या बॅगमधील 38 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण ज्यांची किंमत 1 लाख 14 हजार रुपये आहे. हे कोणी तरी चोरट्याने चोरले आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आर.सी.मिरदौडे अधिक तपास करीत आहेत.
