देगलूर,(प्रतिनिधी)- देगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन बालिकांवर अत्याचार करणाऱ्या तीस वर्षे युवकाला देगलूर पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेबद्दल ची सविस्तर माहिती अशी की दिनांक 17 जानेवारी रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे देगलूरच्या हद्दीत एका 14 वर्षीय अल्पवयीन बालिकेला आणि सोबतच दुसरी 13 वर्षीय अल्पवयीन बालिका अशा दोन बालिकांना बळजबरीने सोबत घेऊन अनिल बालाजी हिंगमिरे (30) हा युवक दुचाकी वर बसवून घेऊन गेला. पुढे एका वेअर हाऊस जवळ दोन्ही बालिकांसोबत जबरदस्ती केली आणि दोघींवर अत्याचार केला. सोबतच अनैसर्गिक कृत्य केले.अत्याचार पूर्ण झाल्यानंतर परत येत असताना दुचाकी स्लिप झाली आणि दोन अल्पवयीन बालिका आणि त्यांच्यावर अत्याचार करणारा बालाजी अनिल हिंगमिरे असे तिघे खाली पडले, तिघांना मार लागला. आता घरी समस्या येईल म्हणून मुली उसाच्या शेतातील झोक्या जवळ रात्रभर राहिल्या 18 जानेवारीचा दिवस उजाडल्यावर याबाबतची हकीकत आपल्या घरच्या लोकांना सांगितली. त्यानंतर पोलीस ठाणे देगलूर येथील पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पुनम सूर्यवंशी यांनी या बालिकांचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देगलूर पोलिसांनी अनिल बालाजी हिंगमिरे विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (3) 377, पॉक्सो कायद्याच्या कलम 4 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा क्रमांक 28/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास देगलूरचे पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलिसांनी त्वरित प्रभावाने बालाजी हिंगमिरेला अटक केली आहे.