नांदेड(प्रतिनिधी)-चालत्या वाहनामधून साहित्य चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चालत्या गाडीच्या ताडीपत्रीला छिद्र पाडून चालत्या गाडीतूनच साहित्य बाहेर फेकले गेले. त्यात काजू आणि सिगरेटच्या डब्यांचा समावेश आहे. या चोरीच्या प्रकरणात एकूण 2 लाख 92 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.
भारत तारुसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते जी.एस.सोखी ट्रान्सपोर्ट नांदेड येथे वाहन क्रमांक एम.एच.46 एफ 2456 वर काही दिवसांपासून चालक म्हणून काम करतात. हे वाहन नांदेड येथून वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे साहित्य घेवून नांदेड-किनवट -नांदेड असा प्रवास करते.
दि.17 जानेवारी रोजी रात्री ही गाडी क्रमांक 2456 घेवून भारत चव्हाण मुरमुरागल्ली नांदेड येथून किनवटकडे निघाले. भोकर फाटा येथे काही वेळ थांबले. चहा पिऊन पुन्हा प्रवास सुरु झाला. त्या दिवशी गाडीत फक्त एकटे चालक भारत चव्हाण हे होते. मध्यरात्री 12 वाजेच्यासुमारास ते भोकर चौकात थांबवले आणि खाली उतरून गाडीच्या चारही बाजूने तपासणी करतांना त्यांना दिसले की, गाडीला बांधलेल्या ताडीपत्रीत मागच्या बाजूला छिद्र आहे आणि दोरी कापलेली आहे. त्यातील दोन सिगरेटचे डाग ज्यामध्ये 2 लाख 50 हजार रुपयांचे सिगरेट होते. तसेच काजूने भरलेले दोन लोखंडी पत्राचे डब्बे 24 हजार रुपये किंमतीचे आणि पान मसाल्याचा एक डाग 18 हजार रुपये किंमतीचा असा एकूण 2 लाख 92 हजार रुपयंाचा ऐवज चोरीला गेला होता. हा घटनाक्रम 17 जानेवारीच्या रात्री 10.30 ते 18 जानेवारीच्या रात्री 12 वाजेदरम्यान घडला आहे. चालत्या गाडीतून चोरी करणे म्हणजे गाडीतून एक माणुस साहित्य बाहेर फेकत असेल आणि त्या मागे येणाऱ्या एखाद्या वाहनातील दुसरे व्यक्ती ते फेकलेले साहित्य जमा करत असतील. हा एक नवीन प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आला आहे. चालतत्या गाडीतून साहित्याची चोरी होणे हा प्रकार राज्यात आणि देशात अनेक जागी घडतो पण नांदेड जिल्ह्यात असा प्रकार यापुर्वी घडल्याची माहिती नाही. भोकर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 379 नुसार गुन्हा क्रमांक 26/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
वाचकांच्या सुविधेसाठी या प्रकरणाचा प्राप्त असलेला व्हिडीओ जोडला आहे.
