भोकर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, नांदेड जिल्हा व भोकर आरोग्य विभागाच्या वतीने भोकर शहरात गोवर रुबेला दूसरी फेरी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. दूसरी फैरी दि.१५ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये ९ महिने ते १२ महिन्यामध्ये गोवर रुबेला लसीचा पहिला डोस, जिवनसत्व अ मात्रा आणि १६ ते २४ महिन्यामध्ये गोवर रुबेला लसीचा दुसरा डोस व जिवनसत्व अ मात्रा देण्यात येणार आहे. तसेच ९ महिने ते ५ वर्षे पर्यंतच्या वंचित बालकांना गोवर रुबेला लस व जिवनसत्व अ ची मात्रा देण्यात येणार आहे.
गोवर रुबेला दूसरी फेरी लसीकरण मोहिम मध्ये आवश्य घेण्या बाबत व भोकर शहरातील एकही बालक दि.२५ जानेवारी पर्यंत गोवर लसीकरण पासून वंचित राहू नये, याची खबरदारी पालकांनी व समाज बांधवांनी घ्यावी असे आवाहन भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अनंत चव्हाण , डॉ. सागर रेड्डी, डॉ सारीका जावळीकर मॅडम बालरोग तज्ञ व सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक यांनी केले आहे.
दूसरी फेरीचे भोकर शहरात नऊ सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अपेक्षित लाभार्थी पहिला डोस २७, दुसरा डोस २८, जिवनसत्व अ मात्रा १५५ लाभार्थी अपेक्षित आहेत.
गोवर रुबेला दुसरी फेरी
लसीकरण सत्रात काम करणारे कर्मचारी श्रीमती सरस्वती दिवटे, मुक्ता गुट्टे आरोग्य सेविका, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ते व मदतनीस हे काम करत आहेत.
या सत्राचे पर्यवेक्षण डॉ अनंत चव्हाण, डॉ सागर रेड्डी व सत्यजीत टिप्रेसवार हे करित आहेत..