

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस दलात आता दोन नवीन पोलीस पथके जिल्हाभर स्वतंत्रपणे अवैध्य आणि बेकायदेशीर कामांवर थेट पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीत कार्यवाही करण्यासाठी तयार करण्यात आले असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. या अगोदर माजी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या कार्यकाळात अशेच एक पथक होते त्या पथकाने अनेक कार्यवाह्या करून आपले नाव आभाळापेक्षा उंच केले होते.
नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दोन नवीन पोलीस पथकांची स्थापना केली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.या दोन पथकांमध्ये एका पथकाचे प्रमुख उस्मानगर येथील सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांना करण्यात आले आहे.त्यांच्या सोबत पोल्सी अंमलदार व्यंकट गंगुलवार (वजिराबाद पोलीस ठाणे) आणि शेख जावेद (पोलीस मुख्यालय) हे काम करतील,दुसऱ्या पथकाचे प्रमुख शिवाजीनगर येथील सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे असतील.त्यांच्या सोबत शिलराज ढवळे (पोलीस ठाणे शिवाजीनगर) आणि चंद्रकांत स्वामी (पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण) हे सहकारी पोलीस अंमलदार असतील.
या पथकातील पांडुरंग भारती यांनी या अगोदर जवळपास चार वर्षांपेक्षा जास्त काळ नांदेड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेत काम केलेले आहे.रवी वाहुळे यांनी अनेक क्लिस्ट प्रकरणाचा तपस केलेला आहे.पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीत हे दोन नवीन पथक तयार करण्यात आले आहेत. पण या आदेशाला वृत्त लिहीपर्यंत कोणीही अधिकारी किंवा पोलीस अंमलदार दुजोरा मात्र देत नाही.