नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पेालीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईलची जबरी चोरी घडली आहे. तसेच धर्माबाद, इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. विमानतळ आणि नांदेड ग्रामीण दोन मोबाईल चोरीला गेल्या आहेत.
देगलूर नाका येथील शेख अफरोज शेख फेरोज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता ते आणि त्यांचे मालक दुचाकीवर जात असतानंा त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन जणांपैकी एकाने त्यांच्या हातातील दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरी चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक आनंद बिच्चेवार अधिक तपास करीत आहेत.
ऋषीकेश रामकिशन पवार यांनी आपला आयफोन 65 हजार रुपये किंमतीचा आपल्या नाईक इन्स्टीट्युट ऑफ टेकनॉलॉजी येथे आपल्या बॅगमध्ये ठेवून परिक्षा देण्यासाठी गेला. त्याला ती बॅग बाहेर ठेवावी लागली. त्यातून तो 65 हजार रुपये किंमतीचाी चोरीला गेला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गिते हे करीत आहेत.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मदनसिंह शितलसिंह ठाकूर यांच्या घरातून 32 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि किराणा दुकानातील 15 हजार रुपये रोख रक्कम असा 32 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार देशमुख हे करीत आहेत.
धर्माबाद आणि इतवारा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 95 हजार रुपयांच्या दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. याबद्दल स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
