नांदेड (प्रतिनिधी)- शर्मा ट्रव्हल्सच्या मुख्य कार्यालयासमोरून 73 हजार 270 रूपयांचे पार्सल चोरीला गेले आहे. 7 दिवसानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड-लातूर रस्त्यावरील नवा पूल संपल्यानंतर शर्मा ट्रव्हल्सचे मुख्य कार्यालय आहे. तेथील नोकर संगमेश्वर अण्णाराव मिरजवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता शर्मा ट्रव्हल्सची गाडी सोलापूर येथून आली. या गाडीमध्ये असलेले एक पार्सल अहिल्या हॅण्डलूम नांदेड यांच्या नावाचे होते. ते पार्सल मुख्य कार्यालयासमोर ठेवले होते. पण कोणीतरी ते चोरून नेले. 5 जानेवारी रोजी घडलेल्या या प्रकाराचा गुन्हा 12 जानेवारी रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गिते यांच्याकडे देण्यात आला आहे.