क्राईम ताज्या बातम्या

ऑनलाईन फसवणुक करून 2 लाख 98 हजार रूपये गायब

नांदेड (प्रतिनिधी)- डॉक्टर लेनमधील एका व्यक्तीच्या बॅंक खात्यातून 2 लाख 98 हजार 499 रूपये ऑनलाईन गायब करण्यात आले आहेत. हा प्रकार 19 डिसेंबर 2022 ते 24 डिसेंबर 2022 दरम्यान घडलेला आहे. गुन्हा 12 जानेवारी रोजी दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टर लेन वजिराबाद येथे राहणारे मंगेश सुर्यकांत चिद्रावार यांना लाईट बिलबाबत व्हॉट्‌सऍप कॉल आला आणि शंभर रूपये भरण्यास सांगितले, आणि इथेच गडबड झाली. त्यांच्या बॅंक खात्यातून 19 ते 24 डिसेंबरदरम्यान 2 लाख 98 हजार 499 रूपये ऑनलाईन काढून घेण्यात आले.

वजिराबाद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र. 9/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (डी) नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे देण्यात आला आहे.

व्हॉट्‌सऍपवर कोणतीही एजन्सी कॉल करत नाही. वास्तव न्यूज लाईव्ह सुद्धा दरवेळेस ऑनलाईन फसवणुकीबाबत वाचकांना विनंती करत असते की, अशा विविध फसवणुक होत असतात तेव्हा कोणत्याही एजन्सीबाबत किंवा कोणत्याही कार्यालयातून, बॅंकतून असा कॉल येत नसतो, तेव्हा त्याबाबत जागरूक रहा आणि खात्री पडल्याशिवाय कोणताही ऑनलाईन व्यवहार करू नका नाहीतर अशाच प्रकार ऑनलाईन फसवणुकी होतात. आता तरी वाचकांना आपल्या ऑनलाईन फसवणुकीबाबत जागरूक राहून अशा कोणत्याही ऑनलाईन बोलण्याला मान्य करू नका, नाहीतर पुन्हा ऑनलाईन फसवणुकी होतील.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *