ताज्या बातम्या नांदेड

हरवलेले 14 मोबाईल पोलीस अधिक्षकांनी मालकांना दिले

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस रेझिंग डे चे औचित्य साधून पोलीस विभागाने 14 जणांचे हरवलेले मोबाईल त्यांना परत केले आहेत. या कामगिरीमध्ये वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाची कामगिरी महत्वपुर्ण आहे.
पोलीस अधिक्षक चंद्रसेन देशमुख आणि पोलीस निरिक्षक जगदिश भंडरवार यांच्या नेतृत्वात आणि सायबर विभागाचे पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक थोरवे आणि पोलीस उपनिरिक्षक दळवी यांच्या तांत्रिक मदतीत वजिराबाद गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार गजानन किडे, शरदचंद्र चावरे, विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, संतोष बेल्लुरोड, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम, रमेश सुर्यवंशी, शेख इमरान शेख एजाज यांनी हरवलेल्या 27 मोबाईलचा शोध लावला.
आज पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी पोलीस रेझिंग डे चे औचित्य साधून 14 लोकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत केले आहेत. ज्यांना मोबाईल परत करण्यात आले त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. गणपत गंगाधर फेदनळे रा.कैलासनगर नांदेड, नागनाथ गंगाधर घगे रा.पारडी ता.किनवट, अभय रोहिदास जाधव रा.सोमठाणा ता.वसमत जि.हिंगोली, शिवमाला अजयकुमार सुगावे रा.फरांदेनगर नांदेड, वर्षा आनंद मोरे रा.आंबेडकरनगर नांदेड, निहाल अनिल अटकोरे रा.आंबेडकरनगर नांदेड, मनोज लक्ष्मणराव चव्हाण रा.दत्तनगर नांदेड, किरण माधवराव मामीडवार रा.जुना मोंढा नांदेड, जबी अरफात मुल्ला रा.नई अबादी नांदेड, सोनाली अभय सुवर्णकार रा.काबरानगर नांदेड, निलेश चंद्रकांत डोके रा.समतानगर नांदेड, प्रतिक गणेशराव देसवसरकर रा.नांदेड, आरती संदीप भाकरे रा.वरकडवाडी जि.नांदेड, उज्वला मिलिंद लोणे रा.लेबरकॉलनी नांदेड .

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *