नांदेड(प्रतिनिधी)-आर्य चाणक्य सेना नांदेड यांच्या वतीने वेद विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वेटर चे वाटप करण्यात आले श्री समर्थ वेद विद्यालय ढालेगाव या ठिकाणी वेद विद्यालयात शेकडो विद्यार्थी वेद पठण करून त्याचा अभ्यास करत आहेत . यावर्षी थंडी खूप मोठ्या प्रमाणात पडलेली असून पाठशाळेमध्ये लहान लहान मुले अध्ययन करत आहेत पाठशाळामध्ये पहाटे लवकर उठून स्नान संध्या वंदन करून वेध अध्ययन करण्यासाठी बसावं लागत असतं त्यामुळे त्यांचा थंडीपासून बचाव व्हावा या उद्देशाने कृष्णा बेरळीकर जिल्हाध्यक्ष आर्य चाणक्य सेना यांच्या वतीने स्वेटर व उबदार वस्त्रांचे वाटप करण्यात आले यावेळी पाठशाळेचे व्यवस्थापक अध्यापक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
नांदेड(प्रतिनिधी)-महेबुबनगर येथे गेलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालणाऱ्या व्यक्तीविरुध्द विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. दि.12 एप्रिलच्या सायंकाळी 7.30 वाजता बिनतारी संदेश यंत्रणेवर माहिती आल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिटमार्शल-2 या पदावर विक्रांत दिगंबरराव देशमुख हे कार्यरत होते. बिनतारी संदेश यंत्रणेने सांगितल्याप्रमाणे विक्रांत देशमुख महेबुबनगर भागात गेले. तेथे शेख अजहर याने तु आमच्यामध्ये कशाला आलास. […]
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या प्रत्येक विभागाकडून विविध उपक्रमांचे नियोजन रिव्हर्स ऑफ इंडिया या उपक्रमांतर्गत शुक्रवार 17 डिसेंबर पासून नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाने निर्देशीत केलेल्या पाच घटकांवर आधारीत जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. येत्या 11 जानेवारी रोजी सकाळी 11.11 मिनिटाला जिल्ह्यातील सर्व शाळांसह शासकीय, निमशासकीय सेवाभावी संस्था, […]
नांदेड(प्रतिनिधी)-एक अल्पवयीन बालिका शोधुन पुन्हा तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करून पोलीसांनी पोलीसींग पेक्षा वेगळे काम करत एक आदर्श तयार केला. पोलीस ठाणे विमानतळ येथे एक 15 वर्षीय बालिका कोणी तरी अज्ञात लोकांनी अज्ञात कारणासाठी पळविल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक 352/2021 भारतीय दंड संहिततेच्या कलम 363 नुसार दाखल झाला होता. ही मुलगी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस पथकाने […]