नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिकाऱ्यांसाठी त्यांच्या गणवेश भत्यामध्ये 5 हजार रुपयांची वाढ मंजुर करण्यात आली आहे.
पोलीस दलातील पोलीस उपनिरिक्षक ते अपर पोलीस अधिक्षक यांना दर चार वर्षाकरीता प्रत्येकी 5 हजार रुपये इतक्या अनुदानात मान्यता देण्यात आल्या बाबतचा शासन निर्णयावर आता वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता पोलीस उपनिरिक्षक ते अपर पोलीस अधिक्षक या पदांवरील पोलीस अधिकाऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये इतका गणवेश भत्ता दिला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागातील कार्यासन अधिकारी योगेश गोसावी यांची या आदेशावर स्वाक्षरी आहे. हा शासन निर्णय शासनाने संकेतांक क्रमांक 202301051638234729 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
