नांदेड(प्रतिनिधी)-2 जानेवारी रोजी एका 8 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या 25 वर्षीय युवकाला पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने आज जेरबंद केले आहे.
दि.2 जानेवारी रोजी पोलीस ठाणे वजिराबादच्या हद्दीत एका 8 वर्षीय बालिकेवर 25 वर्षीय युवकाने बातमीत लिहिता येणार नाही अशा पध्दतीचा अत्यार केला. या संदर्भाने गुन्हा क्रमांक 2/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 354(अ), 354(1), (3) सोबत सह कलम बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम 8/12 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री गिरे या करीत आहेत.
या प्रकरणातील आरोपी पोलीसांना शोधणे अत्यंत आवश्यक होते. त्यानुसार पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी आपले सहकारी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांना हा आरोपी जेरबंद करण्याची सुचना केली. त्यानुसार संजय निलपत्रेवार आणि पोलीस अंमलदार गजानन किडे, रमेश सुर्यवंशी यांनी आज हा 8 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा जाविद मोहम्मद अब्दुल सत्तार (25) व्यवसाय चिकन विक्री यास जेरबंद केले. उद्या कायद्याची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी जावीद मोहम्मद अब्दुल सत्तार यास न्यायालयासमक्ष हजर करण्यात येणार आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अभिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आदींनी वजिराबाद गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.
