नांदेड(प्रतिनिधी)-आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि इतर उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या उपस्थितीत पोलीस अधिक्षक कार्यालयातील अनेक अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी क्रांतीज्येाती सावित्रीबाई फुले यांना पुष्पअर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी लष्करे, पोलीस उपनिरिक्षक उत्तम वाघमारे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान कागणे, पोलीस अंमलदार शामका पवार यांनी चांगल्याप्रकारे केले.
क्रांतीज्योती ” सावित्रीबाई फुले ” यांच्या जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर येथे अभिवादन करतांना डॉ. निळकंठ भोसीकर साहेब जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड, सचिन कोताकोंडवार, डॉ. अनंत चव्हाण वैद्यकीय अधिक्षक, डॉ नितीन कळसकर, डॉ सागर रेड्डी, सत्यजीत टिप्रेसवार, बालाजी चांडोळकर, गंगामोहन शिंदे, अत्रिनंदन पांचाळ ग्रा.रु.भोकर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.