नांदेड, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकामुळे औरंगाबाद विभागामध्ये तात्काळ प्रभावाने निवडणूक आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आचार संहितेमुळे दिनांक 2 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
