नांदेड(प्रतिनिधी)-पंडीत दिनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठाणच्यावतीने दिले जाणारे पत्र भुषण पुरस्कार यंदाच्या वर्षी सन 2022 साठी पत्रकार पन्नालाल शर्मा आणि अभय कुळकजाईकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा नरेंद्र-देवेंद्र महोत्सवाचे स्वागताध्यक्ष डॉ.सचिन उमरेकर व संयोजक ऍड.दिलीप ठाकूर यांनी केली आहे.
दि.11 आणि 12 फेबु्रवारी 2023 रोजी होणाऱ्या नरेंद्र -देवेंद्र महोत्सवात हे पत्र भुषण पुरस्कार पन्नालाल शर्मा आणि अभय कुळकजाईकर यांना देण्यात येणार आहेत. हे पुरस्काराचे स्वरुप रोख 5 हजार रुपये, स्मृती चिन्ह, मानपत्र आणि महावस्त्र असे आहे. कै.सुधाकररावजी डोईफोडे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.
नांदेड येथील पत्रकार पन्नालाल शर्मा आणि अभय कुळकजाईकर यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट वार्तांकन केलेले आहे, सामाजिक घडामोडींवर त्यांनी लेखन केलेले आहे. आर्थिक घडामोडींवर सुध्दा त्यांनी आपल्या शाईला शब्दांचे रुप दिलेले आहे.
