ताज्या बातम्या नांदेड

वजिरबाद गुन्हे शोध पथकाची जबरदस्त कामगिरी ;9 लाख 65 हजारांचा चोरीचा ऐवज जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांच्या नेतृत्वात वजिराबाद पोलीस पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने तीन युवक आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना पकडून 3 सोन्याचे गंठण, सहा चोरीच्या दुचाकी गाड्या आणि 17 चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. सोबत जनतेचे हरवलेले 27 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या सर्व ऐवजाची एकूण किंमत 9 लाख 65 हजार 600 रुपये आहे.
वजिराबाद येथील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार गजानन किडे, शरदचंद्र चावरे, मनोज परदेशी, संतोष बेल्लुरोड, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम, रमेश सुर्यवंशी हे नाकाबंदी करत असतांना त्यांनी अमन उर्फ अमन्या किशन जोगदंड(18) रा.खोब्रागडेनगर, राहुल उर्फ हिपॉप -माणिका लिंगायत(19) रा.चोरंबा ता.अर्धापूर , करण उर्फ गोपाळ श्रावण यादव उर्फ दहेलीवाले (18) रा.सोमेश कॉलनी नांदेड आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशा चार जणांना पकडले. यांचा एक साथीदार रोहण उर्फ पीके अंबादास गायकवाड रा.विष्णुनगर असल्याचे प्रेसनोटमध्ये लिहिलेले आहे. पकडलेल्या चारमधील आणि नावे असलेल्या सर्वांविरुध्द चोरी, जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत.
या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर सायबर विभागाचे पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे, पोलीस उपनिरिक्षक दळवी, पोलीस अंमलदार राजू सिटीकर, दिपक ओढणे यांच्याकडून तांत्रिक मदत घेवून वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने या चोरट्यांनी स्नॅचिंग केलेले सोन्याचे तीन गंठण, सहा चोरीच्या दुचाकी आणि 17 चोरीचे मोबाईल असा 6 लाख 95 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच जनतेचे गहाळ झालेले 27 मोबाईल ज्यांची किंमत 2 लाख 70 हजार रुपये आहे. असा एकूण 9 लाख 65 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये पोलीस ठाणे शिवाजीनगर, भाग्यनगर या ठिकाणी घडलेले चोरी आणि जबरी चोरीचे सहा पेक्षा जास्त गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाचे या उत्कृष्ट कामगिरीसाठी कौतुक केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *