नांदेड(प्रतिनिधी)-एक 40 वर्षीय व्यक्ती अर्धापूर परिसरातून बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाणे अर्धापूर येथे करण्यात आली आहे. त्यांच्या नातलगांनी जनतेला आवाहन केले आहे की, छायाचित्रातील व्यक्ती कोणास दिसल्यास संपर्क साधावा.
पोलीस ठाणे अर्धापूर येथे दाखल झालेल्या हरवल्याची नोंद असलेल्या सदरात असे नमुद आहे की, शेख साजीद शेख अहेमद (40) रा.अकसा कॉलनी अर्धापूर हे 20 डिसेंबर 2022 पासून बेपत्ता आहेत. त्यांच्या नातलगांनी अर्धापूरचा मिसींग अहवाल आणि त्यांचा फोटो जोडून जनतेला आवाहन केले आहेकी, छायाचित्रात दिसणारे व्यक्ती कोणी पाहिले तर मोबाईल क्रमांक 9049945365 आणि 8007355936 आणि 9970112244 या क्रमांकावर या बद्दलची माहिती द्यावी.
