नांदेड,(प्रतिनिधी)-आज दि. २४ डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव ता. अर्धापूर येथे कुटुंब कल्याण चा दुर्बीणद्वारे (लप्रोस्कोपी) शिबीर घेण्यात आले. ४९ महीलांचे दुर्बीण द्वारे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी अर्धापूर डॉ.आकाश देशमुख, डॉ श्रीकांत शिंगरवाड वैद्यकीय अधिकारी मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर घेण्यात आले. शिबीरात दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया डॉ बेले यांनी केल्या. कुटुंब कल्याण शिबीराचे नियोजन आरोग्य सहायक एस.पाटील, अरुण गादगे, आरोग्य सहाय्यीका श्रीमती कुलकर्णी, आरोग्य सेविका श्रीमती गुंडले, घनसरे पाटील, काळे, खुळे, टीमके आरोग्य कर्मचारी व्यंकटी बकाल, वसंत शिरसे, प्रदीप गायकवाड, बालाजी राऊत व सर्व आशा यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
